पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जम्मू काश्मीर निवडणूक निकाल 2024 वर प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
दिल्ली : जम्मू काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. हरयाणामध्ये विजयाची हॅटट्रीक करुन नवीन इतिहास रचायला भाजपला यश आले आहे. काश्मीरमध्ये मात्र भाजपला पराभव सहन करावा लागला आहे. काश्मीरच्या लोकांनी स्थानिक पक्षांना महत्त्व देत बहुमत दिले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस पक्ष युती करुन काश्मीरमध्ये सत्तास्थापन करणार आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देत भाजप पक्ष मोठा असल्याचे म्हटले आहे.
काश्मीरच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “नवरात्रीचा सहावा दिवस आहे. देवीच्या प्रार्थनेचा दिवस आहे. देवी वाघावर विराजमान आहे आणि देवीच्या हातात कमळ आहे. देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरियाणाता सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. गीताच्या भूमीवर सत्य, विकास आणि सुशासनची जीत झाली आहे. प्रत्येत जाती आणि वर्णाच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कित्येक दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शांततेत निवडणूक पार पडली आहे. मतमोजणी झाली, निकाल समोर आले की, भारतीय संविधानाची जीत आहे”,असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : कोलकाता अत्याचारप्रकरणात मोठी अपडेट; तब्बल 45 वरिष्ठ डॉक्टरांचा राजीनामा
पुढे ते म्हणाले की, “मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील खूप खूप शुभेच्छा देतो. मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या जनेतलाही शुभेच्छा देतो. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तप आणि तपश्चर्यासाठी नमन करतो. भारताच्या लोकशाहीची जीत आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या आघाडीला जास्त जागा दिल्या आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देत आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढत होते त्यामध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे,” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.