File Photo : Vinod Tawde
विरार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी (दि.18) संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तत्पूर्वी विरारमध्ये जोरदार राडा पाहिला मिळाला. या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला.
संबंधित बातम्या : प्रचारतोफा थंडावताच नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात जोरदार राडा; समर्थक भिडले आमनेसामने
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार रिंगणात आहेत, जे 2019 च्या तुलनेत 27.7 टक्के जास्त आहेत. यामध्ये 2,086 अपक्ष उमेदवार आहेत. 2019 मध्ये एकूण 3,239 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 5 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसारख्या दिग्गज नेतेमंडळींच्या प्रचारसभा झाल्या.
दरम्यान, प्रचारसभा संपल्या असल्या तरीही आता छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यातच विरारमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहिला मिळाले. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून करण्यात आला. आता विरोधी बहुजन विकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे.
विरारमध्ये भाजप विरूद्ध बहुजन विकास आघाडीत लढत
विरारमध्ये सध्या भाजप विरूद्ध बहुजन विकास आघाडीत लढत पाहिला मिळत आहे. या ठिकाणी भाजपकडून राजन नाईक हे निवडणूक लढवत आहेत. तर हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच मतदारसंघात तावडेंकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
जाऊ द्या, मला माफ करा…
दरम्यान, पैसे वाटल्याचे दिसत असल्याने बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी तावडेंना रोखून धरले होते. इतकेच नाहीतर तावडेंना बाहेर पडण्यासही जोरदार विरोध केला. असे असताना ‘विनोद तावडे यांचे मला 25 फोन आले. त्यांनी जाऊ द्या, मला माफ करा’, असे म्हटल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
विनोद तावडेंकडून आरोपांचं खंडन
विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापल्याचे पाहिला मिळाले. मात्र, तावडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं.
संबंधित बातम्या : आतिशी मंत्रिमंडळात गेहलोत यांच्या जागी रघुविंदर शौकीन यांना स्थान; आपचे लक्ष आता जाट नेत्यांवर…