वायनाकडरांचं राहुुल गांधींवरचं प्रेम अबाधीत; प्रियांका गांधींचा २००००० मतांनी दणदणीत विजय
प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाड लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. सीपीआयच्या सत्यान मोकेरी यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव केला आहे. प्रियांका गांधी यांना 6,22,338 मते मिळाली, तर सीपीआयच्या सत्यान मोकेरी यांना ४,१०,९३१ मतांवर समाधान मानावं लागलं. भाजपच्या नव्या हरिदास यांना 1,09,939 मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. विजयानंतर प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाडच्या लोकांचे आभार मानले असून जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मतदानासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
“माझे UDF मधील सहकारी, केरळमधील नेते, कामगार, स्वयंसेवक आणि माझे कार्यालयातील सहकारी ज्यांनी विजयासाठी अविरत परिश्रम घेतले, तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, माझ्या 12 तासांचा (जेवण, विश्रांती नाही) कार प्रवास सहन केल्याबद्दल, आणि आदर्शांसाठी खऱ्या सैनिकांप्रमाणे लढण्यावर आम्ही सर्व विश्वास ठेवतो.” ‘माझी आई, रॉबर्ट आणि माझी दोन मुलं रायहान आणि मिराया आणि जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल आणि धैर्याबद्दल धन्यवाद. माझा भाऊ, राहुल, तू त्या सर्वांमध्ये सर्वात धाडसी आहेस, मला मार्ग दाखवल्याबद्दल आणि माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद!”, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
My dearest sisters and brothers of Wayanad,
I am overwhelmed with gratitude for the trust you have placed in me. I will make sure that over time, you truly feel this victory has been your victory and the person you chose to represent you understands your hopes and dreams and…— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 23, 2024
“वायनाडच्या माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी भारावून गेले आहे. कालांतराने तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल आणि तुम्ही प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीला तुमच्यातीलच समजाल. तुमचे हक्क आणि स्वप्न संसदेत मांडण्यासाठी आतुर आहे, तुमचा आवाज बनून मी संसेदत जाईन, असं त्यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा