छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सूलमधून एक थरारक घटना समोर आली आहे. ३१ जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघनटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक औताडे यांचा प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनॉट भागात त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिन यांचा काटा काढला. गळा चिरून हत्या केली त्यानंतर मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला आहे. त्यानंतर हा हत्याकांड समोर आला आहे.
राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू
लग्नाला नकार दिल्याने काटा काढला
पोलिसांच्या माहितीनुसार, भरती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे. सचिन औताडे त्याच संघटनेत काम करीत होते. ते दोघेही विवाहित आहेत. भारती ही आपल्या पती पासून वेगळी कॅनॉट प्लेसमध्ये एकटी राहत होती. सचिन आणि भरतीचे प्रेमसंबंध होते. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. सचिन विवाहित असल्याने ते नकार देत होते. भारती आणि सचिन हे चार वर्षांपासून एका संघटनेत काम करत होते. ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष असून, सचिन शहराध्यक्ष होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. 31 जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवर भारतीचा मामेभाऊ दुर्गेशही सहभागी झाला. भारतीने मध्यरात्री अफरोजलादेखील बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद झाले. तिघांनी बेदम मारहाण करत सचिनवर चाकूने वार करत जिवे मारल्याची माहिती समोर आली आहे.
१३ दिवसानंतर गोदापात्रात आढळलल मृतदेह
कुटुंब बेपत्ता असलेल्या सचिन यांचा शोध घेत असताना 13 ऑगस्ट रोजी शेवगावलगत मुंगी येथील गोदापात्रात सचिन यांचा मृतदेह आढळून आला.मानेच्या उजव्या बाजूस भक्त्ती, तर हातावर सचिन नाव गोंदलेले होते. यामुळे त्यांची ओळख पटली. शरीरावर गंभीर वार असल्यामुळे ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस तपासात समोर
सचिन यांच्या मित्रांच्या चौकशीत भारतीचा उल्लेख झाला, त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. 31 जुलैपासून भारती राहत असलेल्या फ्लॅटवर परतली नसल्याचे कळताच पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले. रात्री दीडला तिघेही प्लास्टिकमध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले. पैठणच्या पुलावरून त्यांनी मृतदेह गोदावरीत फेकला. 13 दिवसांनंतर मृतदेह 14 किलोमीटरवर वाहत जाऊन मुंगी गावातील पात्रापर्यंत वाहत गेला.
पोलिसांनी कसे केले अटक
अहिल्यानगर गुन्हे शाखेने भारतीचा शोध सुरू केला. भारतीचे सर्व मोबाइल बंद होते. 1 ऑगस्ट रोजी दोघांना साखरखेर्डात सोडून अफरोज पसार झाला. चार दिवसांपूर्वी तो चिकलठाण्याच्या वाहन बाजारात गेल्याचे समजताच पोलिस पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, तो सापडला नाही. पथकाने 80 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच दरम्यान भारतीने एका मित्राला कॉल केला. त्या एका क्रमांकावरून पोलिसांनी साखरखेर्ध्यात नातेवाइकाच्या शेतातून भारतीला ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलिसांनी चार दिवसांत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश मदन तिवारी, भारती रवींद्र दुबे छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अफरोज खान हा पसार आहे. भाऊ असल्याचा दावा करणारा दुर्गेश फार्मसीचे शिक्षण घेऊन एका औषधी कंपनीत नोकरीला आहे.तर फरार असलेला आरोपी अफरोज वाहन खरेदी-विक्री एजंट आहे.
गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक