Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ५० यशस्वी दिवस पूर्ण, रचला नवा इतिहास!

रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाने महाराष्ट्रात एक नवा इतिहास रचला आहे. थिएटरमध्ये सलग ५० दिवस यशस्वीरित्या पूर्ण केले असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2026 | 11:30 AM
राजा शिवाजीची घोडदौड कामय, केले ५० दिवस पूर्ण

राजा शिवाजीची घोडदौड कामय, केले ५० दिवस पूर्ण

Follow Us
Follow Us:
  • जिओ स्टुडिओज्  आणि मुंबई फिल्म कंपनीचा महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रचला इतिहास
  • १०० कोटींचा विक्रम गाठल्यानंतर चित्रपटगृहांमधील ५० दिवसांची दैदिप्यमान घोडदौड कायम
  • रितेश देशमुखचा राजा शिवाजी चर्चेत 
महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने आज चित्रपटगृहांमधील यशस्वी ५० दिवस पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर ‘राजा शिवाजी’ने त्या सर्व अपेक्षांनाही मागे टाकत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश संपादन केले.

रितेश विलासराव देशमुख यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला हा चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र ‘राजा शिवाजी’चे यश केवळ आर्थिक आकडेवारीपुरते मर्यादित नाही. गेल्या ५० दिवसांत या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रेरणा, स्वाभिमानाची भावना आणि इतिहासाबद्दलचा अभिमान पुन्हा एकदा जनमानसात जागवण्यात या चित्रपटाला मोठे यश मिळाले आहे.

Movie Review : ‘Raja Shivaji’ स्वराज्याचा झळाळता इतिहास आणि रितेश देशमुखचा मास्टरस्ट्रोक!!

राजा शिवाजी चित्रपटाची घोडदौड 

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि रयतेच्या कल्याणासाठीचा त्यांचा संघर्ष यांचे भव्य चित्रण ‘राजा शिवाजी’मधून करण्यात आले आहे. इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांना आधुनिक तंत्रज्ञान, नेत्रदीपक दृश्यरचना आणि प्रभावी कथनशैलीची जोड देत या चित्रपटाने प्रेक्षकांना एका विलक्षण ऐतिहासिक अनुभवाची अनुभूती दिली. त्यामुळेच सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून आजही अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

प्रेक्षकांना चित्रपट भावला 

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फळी. रितेश विलासराव देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका चित्रपटाच्या भव्यतेत अधिक भर घालतात.

‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये जगभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ व्यावसायिक यशाची नवी शिखरे गाठली नाहीत, तर इतिहासाविषयीची जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर यांनाही नव्या उंचीवर नेले आहे.

Raja Shivaji Marathi Movie : मराठी मालिकेतले ‘हे’ चेहरे झळकणार मोठ्या पडद्यावर! ‘Chhatrapati’ गाण्यात दिसली झलक

५० दिवसांचा टप्पा पार 

चित्रपटगृहांमधील ५० दिवसांचा टप्पा पार करताना ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक यशस्वी चित्रपट म्हणून नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला वाहिलेली एक भव्य आदरांजली म्हणून ओळखला जात आहे. प्रेक्षकांचे प्रेम, कलाकारांचे समर्पण आणि ‘जिओ स्टुडिओज’ तसेच ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या भव्य दृष्टिकोनातून साकारलेली ही महागाथा मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरली आहे.

Web Title: 50 days completed for raja shivaji riteish deshmukh marathi movie in theatres

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
1

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका
2

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
3

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
4

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.