Mawra Hocane Welcomes Baby Boy: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मनोरंजन विश्वातून एक खूपच गोड बातमी समोर आली आहे. ‘सनम तेरी कसम’ सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मावरा होकेन आता आई झाली आहे. तिच्या घरी एका छोट्या बाळाचं आगमन झालं आहे. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मावरा आणि तिचा नवरा अमीर गिलानी यांनी स्वतः ही गोड बातमी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करून सगळ्यांना हे कळवलं आहे. Mawra Hocane Welcomes Baby Boy:
मावरा आणि अमीरला मुलगा झाला आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एक खूपच क्यूट व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओमध्ये अमीर गिलानी आपल्या बाळाच्या कानाजवळ अजान पठण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले.
त्यांनी आपल्या मुलाचं नाव पण जाहीर केलं आहे. त्यांनी मुलाचं पूर्ण नाव सय्यद अजमेर हुसैन कमल गिलानी असं ठेवलं आहे. पण लाडाने ते त्याला अजमेर म्हणणार आहेत. हे नाव खूपच सुंदर आहे. आई-बाबा झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या घरात सध्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Ameer Gilani and Mawra Hocane have been blessed with a baby boy, whom they have named Syed Azmar Hussain Kamal Gilani. #AmeerGilani #MawraHocane #SocialDiaryMagOfficial https://t.co/9E84OmcUGv — Weekly Social Diary (@SocialDiaryMagz) October 23, 2026
Kamli ZEE Marathi Serial: अखेर कमळी आणि अन्नपूर्णा आजी येणार आमनेसामने! मालिकेत रंगणार नवा अध्याय
मावरा ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतात ती ‘सनम तेरी कसम’ या सिनेमामुळे खूप फेमस झाली. या सिनेमात तिने सरू नावाच्या मुलीची भूमिका केली होती. तिचा साधा अभिनय आणि सुंदर दिसणं लोकांना खूप आवडलं होतं.
हा सिनेमा आजही लोक आवडीने बघतात.या सिनेमाशिवाय तिने पाकिस्तानात खूप काम केलं आहे. ‘ARY म्युझिक’, ‘खिचडी साल्सा’ अशा मालिकांमध्ये आणि अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तिची अभिनयाची शैली खूपच वेगळी आहे.
मावरा आणि अमीर गिलानी या दोघांनी 2025 मध्ये लग्न केलं होतं. दोघांची लव्ह स्टोरी पण खूप चर्चेत होती. दोघे कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. लग्नानंतर दोघे आपल्या संसारात खुश होते आणि आता त्यांच्या आयुष्यात या छोट्या पाहुण्यामुळे अजूनच आनंद आला आहे.सोशल मीडियावर सध्या त्यांच्या बाळाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सगळेच त्यांच्या बाळाला आणि नवीन आई-बाबांना शुभेच्छा देत आहेत.






