Deepika Padukone Pregnancy: ‘फेक बेबी बंप’च्या व्हिडीओवर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. पुढच्या काही दिवसातच ती तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची बातमी आहे. नुकतंच दीपिकाने तिचा नवरा रणवीर सिंग आणि पहिली मुलगी दुआ सोबत मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. त्या फोटोंमध्ये दीपिका तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे.
पण या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा जुना वाद उफाळून आला आहे. काही लोक म्हणतायत की सेलिब्रिटी खोटा बेबी बंप लावून फक्त दिखावा करतात. याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता. आणि आता याच वादावर दीपिकाने जी प्रतिक्रिया दिली आहे, ती खूप चर्चेत आहे. Deepika Padukone Pregnancy:
एका इंस्टाग्राम युजरने दीपिकाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या फोटोशूटवर एक रील बनवला होता. त्या रीलमध्ये तिने दीपिकाला खूप प्रेम दिलं आणि तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीच्या वेळी लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्यावर पण बोलली.
ती मुलगी त्या व्हिडिओत म्हणते, “बेबी दुआ तर अगदी रणवीर सिंह सारखी दिसते. दोघे एकदम सेम टू सेम आहेत. मी दीपिकाच्या पहिल्या प्रेग्नेंसीबद्दल खूप अफवा ऐकल्या होत्या. लोक म्हणत होते तिची प्रेग्नेंसी खोटी आहे, ती नाटक करत आहे. हे सगळं ऐकून खरंच खूप विचित्र वाटतं. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं, हे चुकीचं आहे.
“ती पुढे म्हणते, “प्रत्येक सेलिब्रिटी प्रेग्नेंसीचं नाटक करत नाही. या वेळी पण दीपिका नाटक करत नाहीये. ती खरंच प्रेग्नेंट आहे. त्यामुळे प्लीज तिला हा क्षण एन्जॉय करू द्या. प्रेग्नेंसी हा कोणत्याही बाईच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असतो. दीपिका या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.”
View this post on Instagram
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ दीपिका पादुकोणपर्यंत पोहोचला आणि दीपिकाने स्वतः या व्हिडिओला लाईक केलं आहे. सहसा सेलिब्रिटी ट्रोल करणाऱ्या गोष्टींना उत्तर देत नाहीत, पण तिला सपोर्ट करणारा हा व्हिडिओ बघून दीपिकाने लगेच त्याला लाईक करून आपली पसंती दाखवली आहे.
दीपिकाच्या पहिल्या प्रेग्नेंसीच्या वेळी पण असंच झालं होतं. लोक म्हणत होते की तिचा बेबी बंप छोटा आहे, ती सरोगसी करतेय वगैरे. पण दीपिकाने कधीच या गोष्टींना उत्तर दिलं नाही. तिने शांतपणे आपल्या बाळाला जन्म दिला. दुआचा जन्म झाल्यावर सगळ्यांचं तोंड बंद झालं.
Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष
आता दुसऱ्या वेळी पण तेच होतंय. पण या वेळी लोकच तिच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्या युजरने अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे की प्रत्येक बाईच्या शरीराची रचना वेगळी असते. प्रत्येकीचा बेबी बंप सारखा दिसेलच असं नाही. कोणावरही शंका न घेता तिला तिचा हा गोड काळ एन्जॉय करू द्यायला हवा.
दीपिका आणि रणवीरने शेअर केलेले मॅटर्निटी फोटो खूपच सुंदर आहेत. रणवीर दीपिकाला आणि दुआला जवळ घेताना दिसतोय. दोघांच्या चेहऱ्यावर दुसऱ्या बाळाच्या येण्याचा आनंद स्पष्ट दिसतोय.
सोशल मीडियावर आता दीपिकाच्या चाहत्यांनी त्या रील युजरचं आणि दीपिकाचं दोघांचं पण कौतुक केलं आहे. दीपिकाने लाईक करून एक प्रकारे ट्रोल करणाऱ्यांना उत्तरच दिलं आहे की, मला या गोष्टींनी काही फरक पडत नाही, मी माझ्या आयुष्यात खुश आहे.






