Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद अन् इमरान हाश्मीला धक्का! ‘या’ आजाराचं निदान

Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशामुळे चर्चेत असलेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इमरानची H1N1 चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 05:36 PM
Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इमरान हाश्मीची H1N1 चाचणी पॉझिटिव्ह
  • ‘आवारापन २’च्या यशादरम्यान आरोग्याची चिंता
  • डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला
Emraan Hashmi Health Update: अभिनेता इमरान हाश्मी सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे त्याचा ‘आवारापन २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे, तर दुसरीकडे त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेची बातमी समोर आली आहे. इमरानला स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्याची H1N1 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. इमरान गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कामामुळे सतत प्रवास करत होता.

नेमकं काय घडलं?

इमरान गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कामामुळे सतत प्रवास करत होता. कामानिमित्त त्याला रांची तसेच इतर काही शहरांमध्ये जावं लागलं. याच काळात त्याची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला साधा त्रास वाटत असला तरी डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्याला H1N1 संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या इमरानची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. Emraan Hashmi:

डॉक्टरांनी त्याला काही दिवस पुरेशी विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर गर्दीपासून दूर राहण्यास आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नसल्याचं दिसत आहे.

१४ ऑगस्ट रोजी ‘आवारापन २’ प्रेक्षकांच्या भेटीला

इमरानच्या आजाराची बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा त्याचा ‘आवारापन २’ चित्रपट प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’ या चित्रपटाची पुढची कथा म्हणजे ‘आवारापन २’. या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसादही त्याला मिळाला.

Get well soon ✅#EmraanHashmi tests positive for swine flu amid #Awarapan2 success ⚠️@emraanhashmi has tested positive for swine flu (H1N1) after falling ill following recent work travel, including a trip to Ranchi. The actor, currently in the spotlight for Awarapan 2, has… pic.twitter.com/L0wIxuPcpO — Always Bollywood (@AlwaysBollywood) August 29, 2026

१४ ऑगस्ट रोजी ‘आवारापन २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या कमाईने वेग पकडला. पहिल्याच आठवड्यात सिनेमाने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे इमरानच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

चाहत्यांची चिंता वाढली…

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘बंटवारा १९४७’चीही टक्कर होती. दोन्ही चित्रपट एकाच काळात प्रेक्षकांसमोर आल्याने कोणता सिनेमा बाजी मारणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र ‘आवारापन २’ने चांगली कमाई करत या स्पर्धेत आघाडी घेतली. चित्रपटाच्या यशामुळे इमरानसाठी हा काळ खास ठरत असतानाच त्याच्या आजाराची बातमी आल्याने चाहत्यांची चिंता वाढली. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळताच अनेकांनी दिलासा व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

शरीराला विश्रांती मिळणंही महत्त्वाचं

इमरान हाश्मीने आपल्या अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः गंभीर आणि भावनिक भूमिका साकारण्यात त्याचा वेगळा ठसा पाहायला मिळतो. ‘आवारापन’ हा त्याच्या लक्षात राहिलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या या जुन्या चित्रपटाच्या पुढील भागाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या.

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

आता ‘आवारापन २’च्या यशानंतर इमरानला काही काळ आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. कामाचा सततचा ताण आणि प्रवास यामुळे शरीराला विश्रांती मिळणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इमरान सध्या आराम करत आहे. चाहत्यांनाही आपल्या आवडत्या अभिनेत्याने लवकर पूर्णपणे बरे व्हावं आणि पुन्हा कामाला सुरुवात करावी, अशीच अपेक्षा आहे.

Web Title: Emraan hashmi diagnosed with h1n1 swine flu amid awarapan 2 success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
1

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…
2

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष
3

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Richa Sinha: रिचा सिन्हाची BY FARच्या ‘Friend of the Brand’ म्हणून निवड
4

Richa Sinha: रिचा सिन्हाची BY FARच्या ‘Friend of the Brand’ म्हणून निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.