Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अलौकिक गुरुलीला! कावेरीला शिर्डीत साईबाबांच्या रूपात होणार स्वामींचे दिव्य दर्शन

Jai Jai Swami Samarth Serial : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत कावेरीला शिर्डीत साईबाबांच्या रूपात स्वामी समर्थांचे दिव्य दर्शन होणार आहे. गुरुमंत्र, चमत्कार आणि भक्तीचा अलौकिक सोहळा आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 20, 2026 | 02:17 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jai Jai Swami Samarth Serial : कलर्स मराठीवरील लोकप्रिय आणि भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या ‘जय जय स्वामी समर्थ‘ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अलौकिक आणि चमत्कारिक प्रसंग पाहायला मिळणार आहे. जुलै महिना गुरुदर्शनाचा महिना मानला जात असल्याने मालिकेच्या कथानकातही भक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे.

मालिकेच्या आगामी भागात अक्कलकोटकडे निघालेल्या कावेरीची वाट स्वामींच्या दिव्य लीलेमुळे बदलते आणि ती थेट शिर्डीत पोहोचते. तिथे तिला साक्षात साईबाबांच्या रूपात स्वामी समर्थांचे दर्शन घडते. हा प्रसंग प्रेक्षकांसाठी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा विलक्षण अनुभव ठरणार आहे.

शिर्डीतील पवित्र द्वारकामाईमध्ये पहाटेच्या मंगलमय वातावरणात धूनीसमोर बसलेले साईबाबा कावेरीला दिसतात. यावेळी एक चमत्कारिक घटना घडते. स्वामी धूनीतील जळते लाकूड कावेरीच्या हातावर ठेवतात. मात्र, तिच्या हाताला कोणतीही इजा होत नाही. उलट तिच्या हातावर दिव्य प्रकाशात गुरुमंत्रातील ‘द्रां’ हे अक्षर प्रकट होते. कावेरीला शिर्डीत घेऊन आलेला तरुण साईबाबांमध्ये विलीन होतो आणि स्वामी समर्थ व साईबाबांचे रूप एकरूप होत ‘सबका मालिक एक’ हा संदेश घुमतो.

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

कावेरीला अक्कलकोटऐवजी शिर्डीत कसे आणले, याचे उत्तर देताना स्वामी म्हणतात, “मी माझ्या चिमणीच्या पायात दोरी बांधून तिला ओढून घेतो,” या वचनाची आठवण करून देतात. त्यानंतर स्वामी आपल्या झोळीतून एक चिठ्ठी काढून कावेरीच्या हाती देतात आणि तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवतात.

स्वामींनी त्या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे? कावेरी ही जबाबदारी पूर्ण करू शकेल का? गुरुमंत्र पूर्णत्वाला कधी जाणार? या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागांमध्ये उलगडणार आहेत.

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव

भक्ती, श्रद्धा आणि गुरुकृपेचा हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका दररोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.

Web Title: Jai jai swami samarth serial will soon witness a divine and miraculous sequence in the upcoming episodes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • colors marathi
  • Marathi Serial
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट! शांभवीविरोधात छवी-अनिकेतची युती; मालिकेत रंगणार निर्णायक संघर्ष
1

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट! शांभवीविरोधात छवी-अनिकेतची युती; मालिकेत रंगणार निर्णायक संघर्ष

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना
2

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा
3

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

Kamali Serial : हॉस्टेलमधून ‘कमळी’ची हकालपट्टी! नयनताराच्या घरात मिळणार का स्थान? हृषीने घेतला निर्णय, पाहा Promo
4

Kamali Serial : हॉस्टेलमधून ‘कमळी’ची हकालपट्टी! नयनताराच्या घरात मिळणार का स्थान? हृषीने घेतला निर्णय, पाहा Promo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.