( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Salman Khan Health: बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरला त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये सलमानचा बदललेला लूक पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, सोशल मीडियावर त्याच्या आरोग्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये सलमान खान बारीक झाल्याचे पाहायला मिळाले. तो बरा आहे का, त्याचे वजन कमी झाल्याचे का दिसत आहे असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. मात्र, या चर्चांदरम्यान सलमानने स्वतः कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान, त्याने रात्री उशिरा नवी पोस्ट शेअर केली आहे.
सलमानने त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमानचे स्वत: चे फोटो वेगवेगळ्या लूकमध्या पाहायला मिळत आहेत. एक फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि डोक्यावर हॅट घातली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने एका वेगळ्या स्टाईलची हॅट घातली आहे. आणखी एका फोटोमध्ये त्याने जॅकेट घातले आहे. सलमानचे वेगवेगळ्या पोज आणि स्टाईलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण हे फोटो शेअर करताना लिहिलेले कॅप्शन सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
सलमानने चाहत्यांना, “तुमची तब्येत कशी आहे?” असा प्रश्न विचारला. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्या प्रकृतीची विचारपूस करत, “सर, तुम्ही ठीक आहात ना?” सलमान खानच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले. एका चाहत्याने, “Love you, Bhai,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने, “आम्ही सगळे ठीक आहोत; तुम्ही कसे आहात?” असा प्रश्न विचारत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणखी एका चाहत्याने, “जर तुम्ही ठीक असाल, तर आम्ही सगळे ठीक आहोत,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. तर एका नेटकऱ्याने, “देव माझं आयुष्यही तुम्हाला देवो,” अशी प्रार्थना करत भाईजानवरील आपलं प्रेम व्यक्त केलं.
Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता






