( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
यावेळी पुनीत बालन यांच्या हस्ते ‘बंधू’च्या टीमचा सन्मान करण्यात आला. गणपती दर्शनासोबतच याठिकाणी सुरू असलेल्या भक्तिमय भजनाचा जितेंद्र जोशी यांनी मनमुराद आनंद घेतला. भजनाच्या तालावर जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये यांची ‘बंधू’ची जोडीही अक्षरशः रंगून गेली.
यानंतर उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी एकत्रितपणे गणरायाची आरती केली. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी चित्रपटासाठी आशीर्वाद घेतला. याप्रसंगी चित्रपटाच्या विशेष पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. त्यामुळे ‘बंधू’च्या प्रदर्शनापूर्वीचा हा भक्तिमय क्षण टीमसाठी आणि उपस्थितांसाठी खास ठरला.
रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. दोन भावांमधील अतूट प्रेम, जिव्हाळा आणि नात्याची हळवी, भावस्पर्शी कहाणी ‘बंधू’मधून पाहायला मिळणार आहे.
‘बंधू’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची भावांची जोडी रुपेरी पडद्यावर नेमकी काय जादू दाखवते, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.






