चातुर्मास पर्वातील आई तुळजाभवानीचा महिमा
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप; व्यसनमुक्तीचा देणार शक्तिशाली संदेश
देवी भक्त उषाचे व्रत
देवी भक्त उषाने श्रद्धेने सुरू केलेल्या व्रतामध्ये विघ्न आणण्यासाठी महिषासुर,पातळदेवी, शुक्राचार्य यांच्या दुष्ट युतीने असुरी शक्ती सर्व मर्यादा ओलांडताना दिसतात.उषाच्या घरात अचानक पसरलेला गूढ लाल धूर आणि पूजेचे साहित्य नाहीसे झाल्यामुळे ती हताश होते, तिचे साहित्य पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि आपले व्रत अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त करते.
मात्र, भक्ताची ही अफाट श्रद्धा आणि कष्ट पाहून देवी तुळजाभवानीचा भक्त उद्धाराचा निर्धार अधिक दृढ होतो. परिस्थितिवर मात करण्यासाठी भक्ताला बळ देण्याच्या उद्देशाने तुळजाई उषाच्या आयुष्यातून निसटलेला तो महत्त्वाचा सोमवार पुन्हा आणण्यासाठी प्रत्यक्ष कालचक्र फिरवण्याचा निर्णय घेते. ज्याचे दृश्य अत्यंत रोमहर्षक आहे.
तुळजाईचा महिमा
आई तुळजाभवानीच्या असीम कृपेने आणि भक्तीच्या बळावर उषा या असुरी शक्तींच्या संकटावर कशी मात करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दुष्ट शक्तींच्या डावांना हाणून पाडत देवी आपल्या भक्ताचे कसे रक्षण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तुळजाई ही अशी शक्ती आहे जी नेहमीच दुष्टांचा संहार करत आली आहे आणि आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारी ही देवी कशा पद्धतीने आपल्या भक्तांचे रक्षण करणार हे या मालिकेत अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवण्यात येते. याचमुळे या मालिकेचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. तुळजाईची भूमिका करणारी अभिनेत्री पूजा काळेने ही भूमिका अत्यंत जगली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान आता चातुर्मास पर्वात नक्की काय काय घडणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.






