Adani US Case Dismissal : गौतम अदानींवरील लाखचोरीचे फौजदारी गुन्हे अमेरिका करणार रद्द? 'त्या' अब्जो डॉलरच्या डीलने फीरवली गेम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम अदानी यांनी त्यांच्यावरील खटले रद्द करण्यासाठी वकील रॉबर्ट गुफ्रा यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. गुफ्रा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक वकील आहेत. वॉशिंग्टनमध्ये न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कादेशीर प्रस्ताव मांडला होता.
या प्रस्तावानुसार, अदानींवर लाखचोरीचे गुन्हे मागे घेतल्यास, अदानी समूह अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुमारे १० अब्ज डॉलरची म्हणजे जवळपास ८०,००० कोटी रुपये गुंतवणार आहेत. यामुळे अमेरिकेत नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही ऑफर ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाला अनुसरुन आहे. सध्या या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अदानींवरील फौजदारी गुन्हे मागे घेतले जात असले, तर अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्ससेंच कमिशनन(SEC) ने दाखल केलेला सिव्हिल फ्रॉडचा खटला रद्द करण्यासाठी तडजोड करावी लागली आहे. कोर्टाच्या कागपत्रांनुसार, अदानी ६ दशलक्ष डॉलर आणि त्यांचे पुतणे सागर अदानी १२ दशलक्ष डॉलर असा एकूण १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार आहेत. हा दंड भरताना त्यांनी कोणतेही आरोप मान्य केलेल नाहीत.
नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेने अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतात सौर उर्जा कॉट्रॅक्ट मिळवण्यासाठी २५० दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा, तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, अदानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आङेत. सध्या अमेरिकेतील कायदेशीर वाद मिटल्यामुळे अदानी समूहाला बाजारातून निधी उभारणे, व्यवसायाचा विस्तार करणे सोपे जाईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.






