Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani: तुळजाई भावाला देणार जगातली सर्वात मौल्यवान भेट, रक्षाबंधन स्पेशल

Aai Tuljabhavani: आई तुळजाभवानी मालिकेत आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास चित्रीकरण करण्यात आले असून भावासाठी काय स्पेशल गिफ्ट देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2026 | 11:40 AM
आई तुळजाभवानी रक्षाबंधन स्पेशल

आई तुळजाभवानी रक्षाबंधन स्पेशल

Follow Us
Follow Us:
  • कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानीत रक्षाबंधन स्पेशल
  • आई तुळजा भावाला काय देणार विशेष भेट 
  • रक्षाबंधनासाठी खास भाग 
Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत सध्या ‘आई तुळजाभवानी’, ‘चातुर्मास पर्व’ दाखविण्यात येत आहे. याचदरम्यान रक्षाबंधन विशेष भाग पाहायला मिळणार आहे. ज्यात तुळजाई तिच्या भावाला, जगातली सर्वात मौल्यवान वस्तू भेट देणार आहे. आता ही गोष्ट काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. रक्षाबंधनाचा पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, तुळजाईच्या गावात या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

सणाच्या या मंगलमयी वातावरणात एका बाजूला रायबाच्या घरात सणाची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे महालात छोटी तुळजा आणि तिचा समवयस्क विश्वासू सोबती हरी यांच्या नात्यातली खट्याळ जुगलबंदी सुरू आहे. हरीने तुळजाकडे जगातली सर्वांत मौल्यवान वस्तू मला भिक्षा म्हणून दे…सोने नको, चांदी नको, हिरे -माणिक तर अजिबात नको. असा धोशा गेले काही दिवस लावला असून हे एक कोड आहे, ते तू ओळखायचं असे आव्हान तुळजाला दिले आहे. या कोड्याचे उत्तर या रक्षाबंधन विशेष भागात मिळणार आहे. 

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

या भागात नेमके काय दिसणार 

भक्तीचा वाढता प्रसार आणि भक्तांची अढळ श्रद्धा पाहून तिकडे महिषासुर संतापला असून, त्याने पातळदेवीमार्फत देवीच्या भक्तांवर हल्ला करण्यासाठी आपल्या मायावी असुरांना पाठवले आहे. जे भुजंगाच्या साथीने गावात हाहाःकार माजवतात. यात भुजंगच्या वारुळावरील घावाने असा कोणता चमत्कार घडतो, ज्याने संपूर्ण गाव हादरून जाते? सखूला वाचवताना नागराज स्वतःचा जीव धोक्यात घालतो, पण त्याच्या या त्यागाची किंमत काय? तुळजा विराट नागदेवीच्या रूपात का अवतरते असे अनेक प्रश्न निर्माण करणारा हा अत्यंत नाट्यमय कथाभाग या विशेष भागात उलगडणार आहे. विशेष म्हणजे याच कथाभागात तुळजाईला हरीच्या कोड्याचे उत्तर मिळते. 

या अद्वितीय अद्भुत अलौकिक भक्त उद्धाराच्या प्रवासात छोटी तुळजा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भावाला जगातील सर्वात मौल्यवान आणि पवित्र भेट देणार आहे. हा भावूक आणि रोमहर्षक क्षण आई तुळजाभवानीच्या प्रेक्षकांसाठी विशेष अनुभूती ठरणार आहे.

रक्षाबंधन स्पेशल 

जगभरात २८ ऑगस्टला रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. मालिकांमध्येही या निमित्ताने वेगवेगळ्या कथा पहायला मिळतात. आई तुळजाभवानी मालिका ही प्रेक्षकांची अत्यंत जिव्हाळ्याची मालिका आहे. सध्या चालू असणाऱ्या चातुर्मास पर्वात लहानपणीचे आईचे रूप दाखविण्यात येत असल्याने प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवले आहे आणि आता नक्की कोणती भेट आई तुळजाभवानी आपल्या भावाला देणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे. 

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला

Web Title: Raksha bandhan special aai tuljabhavani to give gift to her brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Aai Tuljabhavani
  • colors marathi
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत
1

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण
2

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत
3

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत

Exclusive: ‘वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली तरी…’, सुनील गोडसे साकारणार स्वामींच्या भूमिकेत जागर शक्तीचा
4

Exclusive: ‘वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली तरी…’, सुनील गोडसे साकारणार स्वामींच्या भूमिकेत जागर शक्तीचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.