Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीतीच्या अटीमुळे दीप-ज्योतीसमोर नवं आव्हान; लग्नाच्या दृश्यांबाबत मानसी सुभाषचा खुलासा

‘दीपज्योती’ मालिकेत प्रीती आणि स्वराजचे लग्न पार पडताच कथानकाला नवे वळण मिळाले आहे. गृहप्रवेशावेळी प्रीतीने ठेवलेल्या अटीमुळे दीप-ज्योतीसमोर नवे आव्हान उभे राहणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 16, 2026 | 02:41 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘दीपज्योती’ मालिका सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अनेक अडथळे, गैरसमज आणि संघर्षांचा सामना करत अखेर प्रीती आणि स्वराज यांचा विवाहसोहळा पार पडला. दीप आणि ज्योती यांनी सर्व संकटांवर मात करत हे लग्न यशस्वीरीत्या घडवून आणलं. त्यामुळे आता सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, लग्नानंतर लगेचच प्रीतीच्या एका अटीमुळे घरात नव्या वादळाची चाहूल लागली आहे.

गृहप्रवेशाच्या वेळी प्रीती सर्वांसमोर एक अनपेक्षित अट ठेवते. ती स्पष्टपणे सांगते की, “सुभद्रा आई माझ्यासोबत असेल तरच मी या घरात प्रवेश करेन, अन्यथा नाही.” तिच्या या भूमिकेमुळे घरातील सर्वजण अवाक होतात. लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच नव्या वादाची ठिणगी पडते आणि दीप-ज्योतीसमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहतं.

प्रीतीच्या या निर्णयामुळे घरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण होणार आहे. तिची अट मान्य केली जाईल का? सुभद्रा तिच्यासोबत गृहप्रवेश करणार का? आणि या नव्या पेचातून दीप व ज्योती कसा मार्ग काढणार? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

दरम्यान, मालिकेत प्रीतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी सुभाष हिने लग्नसोहळ्याच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “प्रीती आणि स्वराजचं लग्न खूप सुंदर आणि भव्य पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही तो सोहळा अगदी खऱ्या लग्नासारखा वाटत होता. फेरे घेताना मला माझ्या स्वतःच्या लग्नाचा विचार येत होता. खरं सांगायचं तर त्या क्षणी माझे हातही थोडे थरथरत होते.”

Alliance OTT Show: 240 देशांमध्ये रंगणार ‘अलायन्स’; कुणाल खेमू होस्ट करणार प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो!

ती पुढे म्हणाली, “लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी प्रेक्षकांना मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. प्रीतीची अट आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना कथानकाला वेगळं वळण देणार आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच वाढेल.”

लग्नसोहळा संपला असला तरी प्रीतीच्या या एका निर्णयामुळे ‘दीपज्योती’ मालिकेत आता नव्या संघर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भरपूर नाट्य आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

Sunita Ahuja On Govinda Hair : ‘नकली केस लावतो’, कॅमेऱ्यासमोर सुनीताने उडवली गोविंदाची खिल्ली? ट्रोलिंगनंतर म्हणाली…

Web Title: New challenge ahead for deep and jyoti due to preetis condition mansi subhash opens up about the wedding sequence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.