Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: आमिर खानचा ‘3 इडियट्स’ हा चित्रपट शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांवरील दबाव यामुळे आजही चर्चेत असतो. चित्रपटातील रँचो या व्यक्तिरेखेचा संबंध लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्याशी असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 30, 2026 | 12:14 PM
Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘3 इडियट्स’च्या रँचोवरून पुन्हा चर्चा
  • आमिर खानच्या भूमिकेवर सोनम वांगचुकांची मिश्कील प्रतिक्रिया
  • आमिरला ‘गजनी’ म्हणत वांगचुकांचा खोचक टोला
 

Sonam Wangchuk Aamir Khan: आमिर खानचा ‘3 इडियट्स’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांवरील दबाव आणि स्वतःच्या आवडीचा मार्ग निवडण्याचा संदेश या सिनेमातून देण्यात आला होता. चित्रपटातील रँचो हे पात्र आणि लडाखमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यात साम्य असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, आता या विषयाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे.

सोनम वांगचुक सध्या त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन आणि उपोषणही केलं आहे. याच काळात आमिर खानने ‘3 इडियट्स’मधील रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचं नाकारल्याचं समोर आलं. आमिरच्या या भूमिकेवर आता सोनम वांगचुक यांनी मिश्कील पद्धतीने उत्तर दिलं आहे.

आमिर खान नेमकं काय म्हणाले होते?

चित्रपट तयार होत असताना आपली सोनम वांगचुक यांच्याशी वैयक्तिक ओळख नव्हती, असं आमिर खानने यापूर्वी सांगितलं होतं. रँचोची व्यक्तिरेखा थेट वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं. आमिरच्या या वक्तव्याबद्दल सोनम वांगचुक यांना एका पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरलं.

सोनम वांगचुक यांचा आमिरला मिश्कील टोला

आमिर खानच्या वक्तव्यावर बोलताना सोनम वांगचुक यांनी थेट वाद घालण्याऐवजी विनोदी अंदाज निवडला. त्यांनी आमिरच्या ‘गजनी’ चित्रपटाचा संदर्भ देत म्हटलं की, कदाचित आमिरला काही गोष्टी आठवत नसतील. Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini:

KK Goswami: ‘विकराल और गबराल’चा गबरू आठवतोय? २३ वर्षांनी केके गोस्वामींची पुन्हा चर्चा; आता काय करतात? जाणून घ्या

वांगचुक यांच्या मते, आमिर त्यांच्यासोबत यापूर्वी भेटले होते. एवढंच नाही तर एका पुरस्कार सोहळ्यातही दोघे एकाच ठिकाणी उपस्थित होते. त्या प्रसंगाची आठवण करून देताना त्यांनी आमिरवर हलकाफुलका टोला लगावला. त्यांच्या म्हणण्याचा सूर असा होता की, एखाद्या कलाकाराने एखादी भूमिका इतकी मनापासून साकारली असेल की त्या पात्राचा परिणाम त्याच्या आठवणींवरही झाला असावा. त्यामुळेच कदाचित जुन्या भेटीची आठवण आमिरला राहिली नसावी, असं त्यांनी विनोदाने सुचवलं.

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य

‘3 इडियट्स’ पूर्ण बायोपिक नाही

सोनम वांगचुक यांनी एक महत्त्वाची गोष्टही स्पष्ट केली. त्यांच्या मते, ‘3 इडियट्स’ हा त्यांचा थेट जीवनपट नाही. म्हणजेच चित्रपटातील प्रत्येक घटना किंवा पात्र त्यांच्या आयुष्याची हुबेहूब नक्कल आहे, असं म्हणता येणार नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या कामाचा, विचारांचा किंवा अनुभवांचा चित्रपटावर प्रभाव पडू शकतो. वांगचुक यांच्या मते, ‘3 इडियट्स’च्या बाबतीतही असं झालं असण्याची शक्यता आहे.

Web Title: Sonam wangchuk takes a dig at aamir khan referencing ghajini makes a major revelation about 3 idiots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.