Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: मराठी चित्रपट ‘संडे १९९६’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या रहस्यमय चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत हे तीन दमदार कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 17, 2026 | 03:31 PM
Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित
  • दिग्गज कलाकार एकत्र
  • ३० ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत हे तीन दमदार कलाकार ‘संडे १९९६’ या रहस्यमय मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. येत्या ३० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातून समोर आलेलं गूढ वातावरण, कोकणाची अनोखी पार्श्वभूमी आणि काळाशी जोडलेलं रहस्यमय कथानक यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. व्ही आर. के. फिल्म्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली असून, लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांचे आहे. Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:

‘संडे १९९६’ची थरारक कहाणी

कधी काळाचं चक्र उलटं फिरतं, कधी भूतकाळ वर्तमानाचा पाठलाग करू लागतो… आणि मग सुरू होतो नात्यांचा, भावनांचा आणि अनुत्तरित प्रश्नांचा गुंतागुंतीचा खेळ! याच रहस्यमय वळणांवर उलगडत जाते ‘संडे १९९६’ची थरारक कहाणी. भूतकाळ आणि वर्तमानाच्या सीमारेषेवर अडकलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा प्रवास अनेक अनपेक्षित घटनांनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे.

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत ठीक…’ अथर्व सुदामेवर कुशल बद्रिकेचा संताप; पुढे काय म्हणाला?

अनपेक्षित वळण मिळणार?

गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत या तीनही कलाकारांनी आपल्या आजवरच्या कामातून अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. ‘संडे १९९६’मध्ये हे कलाकार कोणत्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांसमोर येणार? त्यांच्या भूमिकांचा कथानकाशी नेमका काय संबंध असणार? आणि घटनांना कोणतं अनपेक्षित वळण मिळणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता ट्रेलरमुळे अधिकच वाढली आहे. चित्रपटात या तिघांसह सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या भूमिका आहेत.

प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून

या चित्रपटाची कथा आणि तिची गूढ मांडणी सुरुवातीपासूनच मला भावली. कोकणाची पार्श्वभूमी, कथानकातील अनपेक्षित वळणं आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांनी व्यक्त केला.

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

‘संडे १९९६’मध्ये प्रत्येक घटना, प्रत्येक नातं आणि प्रत्येक वळणामागे एक रहस्य दडलं आहे. प्रेक्षकांनी केवळ पडद्यावर घडणाऱ्या घटना पाहू नयेत, तर त्यामागचे धागेदोरे जोडत या गूढ प्रवासाचा भाग व्हावं, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक उत्तरातून नवा प्रश्न निर्माण करणारी आणि शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच एका वेगळ्या अनुभवातून घेऊन जाईल असं लेखक-दिग्दर्शक जीवन चव्हाण यांनी सांगितलं.

कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याला गूढतेची किनार लाभलेल्या या कथेतून रहस्य, भावभावना आणि थरार यांचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘संडे १९९६’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: हा चित्रपट ३० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • Que: ‘संडे १९९६’मध्ये कोणते कलाकार आहेत?

    Ans: गणेश यादव, पंकज विष्णू, ओंकार राऊत, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या भूमिका आहेत

  • Que: ‘संडे १९९६’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

    Ans: या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Sunday 1996 marathi movie trailer release date cast rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
1

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
2

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार
3

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर
4

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.