( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘झी मराठी’ वाहिनीने नुकतीच आपल्या लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे “बांदेकर पैठणी घेऊन आले…” हा लोकप्रिय आवाज पुन्हा घराघरांत घुमणार आहे.
आदेश बांदेकर यांच्या पुनरागमनाची चर्चा रंगलेली असतानाच ‘झी मराठी’ने प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. वाहिनीवर लवकरच लोकप्रिय गायन स्पर्धा ‘सा रे ग म प’ पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
२००६ साली सुरू झालेल्या ‘सा रे ग म प’ने मराठी संगीतविश्वाला अनेक गुणी गायक दिले आहेत. या कार्यक्रमाचे आतापर्यंत जवळपास ११ यशस्वी पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रत्येक पर्वाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम मराठी रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
आता पुन्हा एकदा ‘सा रे ग म प’च्या माध्यमातून नव्या आवाजांचा शोध घेतला जाणार असून, संगीतप्रेमींना सुरेल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. ‘होम मिनिस्टर’ आणि ‘सा रे ग म प’ या दोन लोकप्रिय कार्यक्रमांच्या पुनरागमनामुळे ‘झी मराठी’च्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नव्या पर्वाबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेच्या स्वरूपाची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे समजते.
View this post on Instagram
दरम्यान, ‘झी मराठी’ने नुकताच ‘सारेगमप’च्या नव्या पर्वाचा खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते यांची झलक पाहायला मिळत असून, त्यांच्या पुनरागमनामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२००६ मध्ये सुरू झालेल्या ‘सारेगमप’ने मराठी संगीतविश्वाला अनेक गुणी गायक दिले आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाचे अनेक यशस्वी पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, प्रत्येक पर्वाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता नव्या पर्वात कोणते नवे आवाज समोर येणार आणि परीक्षक मंडळात आणखी कोणकोणते चेहरे दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ranveer Singh : ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर सिंहच्या कमाईची चर्चा; 300 कोटींपेक्षा जास्त केली कमाई
अवधूत गुप्ते आणि आदेश बांदेकर यांच्या पुनरागमनामुळे ‘झी मराठी’च्या प्रेक्षकांसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला आहे. नव्या पर्वाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील घराघरांत पुन्हा एकदा “तोडलंस राणी…तोडलंस”, “वरचा ‘सा’ परफॉर्मन्स” यांसारखे अवधूत गुप्ते यांचे गाजलेले डायलॉग ऐकायला मिळणार आहेत. नुकताच ‘झी मराठी’ने या नव्या पर्वाचा खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या प्रोमोला “महाराष्ट्राच्या घराघरात पुन्हा रंगणार सुरांची मैफल, कारण गाणं ऐकलं की बरं वाटतं…” असं भावनिक कॅप्शन देण्यात आलं आहे. या एका ओळीनेच संगीतप्रेमींच्या मनातील उत्सुकता आणखी वाढवली आहे.






