गोव्याचे नगरविकास मंत्री व भाजप नेते मिलिंद नाईक यांनी बुधवारी प्रमोद सावंत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. काँग्रेसने मंत्री नाईक यांच्यावर बिहारमधील एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यामुळे काही तासातच नाईक यांनी हे पाऊल उचलले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “मिलिंद नाईक यांनी मुक्त आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी गोवा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, जो स्वीकारण्यात आला आहे आणि माननीय राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.”
गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरोप केला की मिलिंद नाईक एका सेक्स स्कँडलमध्ये सामील आहेत, ज्याबद्दल ते गेल्या महिन्यात पहिल्यांदा बोलले होते. लैंगिक गैरवर्तनाचा तपशील देऊनही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे मी मंत्र्याचे नाव जाहिर करत असल्याचे चोडणकर म्हणाले.
चोडणकर गेल्या महिन्यात पहिल्यांचा आरोपांबद्दल बोलले परंतु मंत्र्याची ओळख जाहिर केली नव्हती, विरोधकांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 15 दिवस वाट पहावी असे सांगितले.
काँग्रेसने मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांची सरकारकडून शंभर टक्के चौकशी होणार. वैयक्तिक पातळीवर लढून स्वत:ला आरोपातून मुक्त करण्यासाठी मिलिंद नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे मंत्रिपद रिक्त राहील,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.






