अपचन, जळजळ, पित्त हे त्रास अनेकांना होत असतात. यामुळे आरोग्यावरही मोठा परिणाम होताना दिसतो. सततच्या अपचनाने पोटाचे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. आवडणारे पदार्थ आपण चवीने खातो, तसेच ते पदार्थ नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जातात. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने अपचन होते. अशा वेळी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थ मदतीला येतात. यांच्या उपयोगानेच हा त्रास कमी करता येतो.
यावर काही सोपे उपाय आपण जाणून घेऊयात,
– पोट फुगले असेल, तसेच अपचन झाले असल्यास दोन लवंग तोंडात टाकून चघळा आणि काही वेळ चाला. थोड्या वेळानंतर आराम मिळेल.
– पोटात दुखत असेल, तसेच मळमळ होत असल्यास ग्लासभर पाण्यात परतलेली जिरे पावडर टाकून घ्यावी.
– अपचनाचा त्रास वारंवार होणाऱ्यांनी जेवणानंतर जिरे पावडर घातलेले पाणी नियमत घ्यावे.
– अनेकांना पोटात जळजळीचा त्रास जाणवतो. अशा वेळी गुळाचा तुकडा चघळावा. मधुमेह असलेल्यांनी गुळाचा वापर करून नये.
– मसाल्याच्या पदार्थांसोबत रायता खाणे पचनासाठी चांगले असते. काकडी, कोथिंबिर, जिरे पावडर या रायत्यात घालावी.
– तुळसदेखील अपचनावर प्रभावी औषध आहे. मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर तुळशीची चार-पाच पाणे चघळल्यास चांगले ठरते.
– अपचनाचा त्रास तीव्रतेने जाणवत असेल, तर चहा किंवा गरम पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकून घेतल्यास आराम मिळतो.
– जेवणानंतर पुदिन्याची पाने चघळणेही चांगले ठरते.