आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकीच एक आहेत आतडे. आपल्या शरीरात लहान आतडे आणि मोठे आतडे असतात, जे आपल्या शरीराची पचनसंस्था सुरळीत करण्यास मदत करत असतात. आपण खात असलेल्या अन्नातून निरोगी आणि पौष्टिक गोष्टींचे पचन करणे हे आपल्या आतड्यांचे कार्य असते. तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यातही यांची मदत होत असते. त्यामुळेच आपल्या आतड्यांचे आरोग्य निरोगी आणि सदृढ बनवणे फार गरजेचे आहे. मात्र अनेकदा आपण या आतड्यांकडे दुर्लक्ष करतो आणि याची नीट काळजी घेत नाही. यामुळेच अनेक आजर ओढवले जातात.
आता आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नक्की काय करावे? असा प्रश्न तुमच्या ,मनात येत असेल. तर चिंता करू नका यासाठी तुम्हाला अधिक काही करायची गरज नाही फक्त तुम्ही यासाठी काही आरोग्यदायी पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. कोणते आहेत ते पदार्थ, चला सविस्तर जाणून घेऊयात.
निरोगी आतडे आपल्या पचनाशी संबंधित असतात. जेव्हा आपले आतडे निरोगी राहतील तेव्हाच आपले वजन नियंत्रणात राहील. तसेच यामुळे अनेक आजार दूर केले जाऊ शकतात. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोक आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खातात, यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते आणि नवीन समस्यांना आमंत्रण मिळते. म्हणूनच जाणून घेऊयात आतड्यांच्या आरोग्यासाठी काय खाणे योग्य आहे. खाली दिलेल्या पदार्थांचे सेवन करून तुम्ही तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारू शकता तसेच त्यात साठलेली घाण यामुळे दूर करता येऊ शकते.
दही
दही एक प्रो-बायोटिक आहार आहे. याच्या सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारले जाऊ शकते. दही आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढविण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच आरोग्यास कारणीभूत ठरणारे प्रतिकूल जिवाणू शरीरातून काढून टाकण्यासही दहीचा वापर केला जाऊ शकतो.
कच्ची केळी
कच्च्या केळीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्मे आढळली जातात. यामुळे आरोग्यदायी आंत मायक्रोबायोम वाढण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळले जाते, जे खराब चरबी पेशी आणि अनेक अशुद्धी साफ करण्यास मदत करतात.
ऍवाकाडो
ऍवाकाडो आरोग्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. वजन कमी करण्यासाठी अनेकदा डाएटदरम्यान याचे सेवन केले जाते. यातील पोषक घटक आतड्यांचे आरोग्य सुधरवण्यास मदत करते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि ह्रदय निरोगी ठेवण्यास याची मदत मिळते.
ग्लुटेनमुक्त ओट्स
ग्लुटेनमुक्त ओट्स हा हा विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत मानला जातो यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तसेच यामुळे रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि ह्रदय निरोगी ठेवण्यास याची मदत मिळते.