file photo
file photo

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. नक्षलवादाविरोधातील निर्णायक लढा म्हणून याकडे पाहिले जात आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नक्षलवादी मारले गेले.

    सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) धामधूम सुरू आहे. अशातच छत्तीसगडमध्ये नक्षलवादी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. छत्तीसगडमध्ये बुधवारी अवघ्या 8 तासांत शोध मोहीम राबवत सुरक्षा दलांनी 13 नक्षलवाद्यांचा खात्मा (Naxalites killed in Chhattisgarh) केला. ज्यामध्ये 3 महिला नक्षलवाद्यांसह 13 नक्षलवादी ठार झाले आहेत. विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंद्रा गावातील जंगलात या नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

    13 नक्षलवाद्यांचा खात्मा

    विजापूरच्या जंगलात मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये एका महिलेसह सुमारे 10 नक्षलवादी ठार झाले. त्यांच्या मृतदेहासह अनेक शस्त्रे आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. यानंतर बुधवारीही नक्षलवाद्यांशी चकमक झाली. अशा स्थितीत बुधवारपर्यंत 3 महिला नक्षलवाद्यांसह 13 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.विजापूरच्या गांगलूर पोलिस स्टेशनच्या डीआरजी, एसटीएफ, कोब्रा, सीआरपीएफसह सुरक्षा दलांच्या पथकांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली.

    छत्तीसगड नक्षलग्रस्त क्षेत्र

    छत्तीसगड नक्षलग्रस्त क्षेत्र आहे. मात्र निवडणुकीच्या काळात त्यांच्या गुन्हेगारी कारवाया तीव्र होतात. लोकसभेच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा दलही अत्यंत सतर्क आहेत. नुकतेच मार्च महिन्यात त्याने ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. विजापूरच्या बासागुडा भागात सुरक्षा दलाच्या पथकाने या नक्षलवाद्यांना ठार केले.