Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली शपथ विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील या शपथविधी सोहळण्याचा उपस्थित आहेत.
निलम गोऱ्हे यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिवसेना-शिंदे गट) त्यांना विधान परिषदेसाठी सलग पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना पक्ष फुटीनंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्या होत्या.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी (नऊ अधिक एक पोटनिवडणूक) २३ एप्रिल ते १३ मे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. त्यानंतर छाननीदरम्यान उर्वरित अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते बाद झाले. परिणामी नऊ उमेदवार आणि नऊ जागा अशी स्थिती निर्माण होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार होते. मात्र, या १० जागांसाठी केवळ १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे सर्व उमेदवारांची थेट निवड निश्चित झाली आहे.
या बिनविरोध निवडणुकीत भाजपचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच शिवसेनेच्या २ उमेदवारांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा १ उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा १ उमेदवाराचाही बिनविरोध विजय झाला आहे. या निवडणुकीमुळे विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.






