नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona Cases In India) रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरापासून सलग पाचशेच्या आत असल्याचं निर्दशनास येत आहे. गेल्या 24 तासात देशात 253 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णसंख्येसह देशातली एकूण रुग्णसंख्या 4 कोटी 46 लाख 73 हजार 166 वर पोहोचली आहे. काल देशात 275 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
[read_also content=”हैदराबादच्या सरकारी रुग्णालयात दोन तृतीयपंथीयांची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती https://www.navarashtra.com/latest-news/two-transgender-appointed-as-a-medical-officers-in-hyderabad-government-hospital-nrps-350490.html”]
सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,672 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात तीन रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशमधील दोन तर केरळमधील एका रुग्णाचा समावेश आहे. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 627 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयान जाहीर केलेल्या आकडेवरुन कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 98.80 टक्के झाला आहे.
चीनमध्ये काल 33,073 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 3,988 लोकं लक्षणे नसलेली आणि 29,085 लक्षणे नसलेली होती, असे येथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी सांगितले.