देशभरात एकीकीडे ऊन तापू लागलय.अनेक ठिकाणी लोकांना उष्माघात होण्याचं प्रमाण वाढलयं. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये लोकांना भर उन्हाळ्यात वादळाचा (Storm in West Bengal) तडाखा बसलाय. पश्चिम बंगालमध्ये रविवारी अचानक आलेल्या वादळानं जनजीवन विस्कळीत झालं. या वादळात चार जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर, या वादळामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली, शेकडो झाडे आणि विजेचे खांब तुटून जमिनीवर पडले आहेत. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक रस्तेही ठप्प झाले आहेत.
[read_also content=”थिएटनंतर आता ओटीटीवर अनुभवता येणार ‘शैतान’ची दहशत, जाणून घ्या चित्रपट केव्हा आणि कुठे पाहू शकता! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgn-and-r-madhavan-starrer-shaitaan-ott-release-date-out-as-per-report-nrps-519369.html”]
वादळाने रविवारी उत्तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागात नासधूस केली, अशी माहिती राज्य अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा मुख्यालय शहर आणि शेजारील मैनागुरीच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली, विजेचे खांबही पडले.
राज्यात वादळाचा सर्वात जास्त प्रभावित भागात राजारहाट, बार्नीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि सप्तीबारी या भागात जाणवला. येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आता झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केलं जात आहे. अधिकाऱ्यांचे पथक मदतकार्यात गुंतले आहे. संपूर्ण परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत. अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वादळाच्या तडाख्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, मदतकार्यासाठी नागरी प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मदतीसाठी क्यूआरटी देखील तैनात करण्यात आले आहेत. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
आज दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे जलपाईगुडी-मायनागुरीच्या काही भागात आपत्ती ओढवली, त्यामुळे मानवी जीवितहानी, दुखापत, घराचे नुकसान, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले हे खेदजनक आहे. जिल्हा प्रशासन मृत्यू झाल्यास तत्काळ कुटुंबाला आणि जखमींना नियमानुसार आणि MCC (मॉडेल कोड ऑफ कंडक्ट) नुसार भरपाई देईल. तो पीडित कुटुंबांसोबत आहे. प्रशासन सर्व प्रकारची मदत करेल.