File Photo : Accident
केरळमध्ये एक भीषण उपघात झाला असून MBBS चं शिक्षण घेणाऱ्या ५ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा जागीच चक्काचूर झाला आणि या विद्यार्थ्यांना कारचे तुकडे करून बाहेर काढावे लागेल.केरळच्या अलाप्पुझा येथे सोमवारी रात्री घडली.
अपघातात मृत्यू झालेले पाचही जण शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे विद्यार्थी होते. मात्र या विद्यार्थ्यांची सुरुवातीला ओळख पटू शकली नाही. अपघातग्रस्त कारमध्ये सात जण प्रवास करत होते, ज्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान या अपघाताचे नेमके कारण काय होते? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे
बळ्ळारी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (BIMS) विद्यार्थी हाँगकाँगमधून परत आले होते. बेंगळुरू विमानतलावर १.३० वाजता उतरून ते बळ्ळारीकडे निघाले असताना. कार झाडाला धडकून ३ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. तर एक डॉक्टर गंभीर जखमी आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील विदापानाकल गावानजीक ही दर्घटना घडली होती. डॉ. योगेश, डॉ. गोविंदराय आणि डॉ. अमरेश यांची ओळख पटली आहे. तर आणखी एक डॉक्टर गंभीर जखमी झाला होता, त्याला बल्लारीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची स्थिती चिंताजनक आहे.
कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातही मोठा अपघात घडला असून एका २६ वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हर्षवर्धन असं या मृत अधिकाऱ्याचं नाव असून ते २०२३ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. हर्षवर्धन हे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. पोलीस वाहनातून ते होलेनरसीपूर येथे त्यांच्या पहिल्या पोस्टिंगसाठी ड्युटीवर जात होते. मात्र, पहिल्या पोस्टिंगसाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात रविवारी संध्याकाळी झाला. हर्षवर्धन प्रवास करत असलेल्या पोलिसांच्या वाहनाचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका घरावर आणि झाडावर जाऊन आदळली.
२०२३ मध्ये यूपीएससी परीक्षेत हर्षवर्धन यांनी घवघवीत यश मिळवलं होतं. त्यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.