फोटो सौजन्य- istock
बऱ्याचदा लोक घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा बागेमध्ये कबुतर आणि इतर पक्ष्यांना खायला घालतात. बऱ्याचदा लोक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कबुतरांना खायला घालतात. मात्र वास्तुशास्त्रामध्ये कबुतरांना शांती, प्रेम आणि एकतेचे प्रतीक मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, कबुतरांना खायला दिल्याने घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. कबुतरांना खायला का घातले जाते? त्यामागे कोणते धार्मिक कारण आहे का? किंवा त्याने कोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रामध्ये कबुतरांना खायला घालणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, त्यांना धान्य खायला दिल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे बरेच लोक दररोज कबुतरांना खायला देतात.
त्यासोबतच सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळी धान्य कबुतरांना खायला देणे खूप शुभ मानले जाते. असे केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते. ज्योतिषशास्त्रानुसार, हा उपाय शनिवारी केल्याने शनिदोषातून सुटका होते आणि जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहते.
तसेच कबुतरांना खायला घातल्यामुळे राहू ग्रहांसोबतच देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद राहतो. त्यामुळे घरात धन आणि समृद्धी टिकून राहते, अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्रांच्या मते, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू आणि बुध ग्रहाची युती असते अशा लोकांनी घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये कबुतरांना खायला घालू किंवा देऊ नये. कारण यामुळे राहूचा वाईट प्रभाव त्या व्यक्तींवर होताना दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार, कबुतरांना शांतीचे प्रतीक मानले जात असल्याने कबुतरांना खायला घातल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यासोबतच असे उपाय केल्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि जीवनातील सर्व समस्यांतून सुटका होते. शास्त्रामध्ये प्राणी पक्ष्यांना खायला देणे हे पुण्यकर्म मानले जाते.
कबुतरांना खायला दिल्याने मानसिक शांती मिळते आणि आपल्यावर असलेला ताण देखील कमी होण्यास मदत होते.
ज्योतिषशास्त्रानुसार कबुतरांना खायला दिल्याने ग्रहांच्या नकारात्मक शक्तींना शांत करण्यास मदत होते.
मान्यतेनुसार, यामुळे पितृदोष शांत होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात.
कबुतरांना खायला घालल्याने एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलते. कबुतरांना खायला दिल्याने आपले नशीब बदलू शकते. तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. तसेच आपले जीवन बदलण्यास मदत देखील होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)