बाजारातून विकत आणलेल्या भाज्या, फळे आणि इतर अन्नपदार्थ जास्त वेळ टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ जास्त वेळ टिकून राहतात, असे सगळ्यांचं वाटते. पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थांमध्ये हानिकारक विषाणू जमा होतात. यामुळे पदार्थाची चव खराब होते आणि जेवणातील आवश्यक घटक कमी होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणते अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
फ्रिजमध्ये ठेवलेले 'हे' पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक
शिजवलेली किंवा कच्ची अंडी फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे फ्रिजमध्ये उग्र वास येण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये कच्ची अंडी ठेवल्यास आतील द्रव गोठतात, ज्यामुळे अंड्याचे कवच फुटण्याची जास्त शक्यता असते.
काकडी, कलिंगड किंवा जास्त पाणी असलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे पाण्याचे रूपांतर बर्फामध्ये होते. त्यामुळे पदार्थाची चव खराब होऊन जाते.
भजी, सामोसा किंवा इतर तळलेले पदार्थ अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे पदार्थाचा कुरकुरीतपणा कमी होऊन जातो. मऊ आणि चव नसलेले पदार्थ आहारात अजिबात खाऊ नये.
फ्रिजमध्ये चुकूनही बिअरच्या बाटल्या ठेवू नये. द्रव पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे गोठून जातात, ज्यामुळे काचेच्या बाटल्या फुटण्याची जास्त शक्यता असते.
शिजवलेला पास्ता किंवा मॅगी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे पदार्थ अतिशय चिकट आणि रबरासारखा होऊन जातो. तसेच पदार्थाची चव सुद्धा खराब होते.