कोटा: कल्पना करा तुम्ही सकाळी लवकर आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये (Bathroom) गेलात आणि तिथे तुम्हाला एक मोठा काळा कोब्रा (cobra snake) साप दिसला तर तुमची अवस्था कशी असेल. याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता. अशा गोष्टीच्या नुसत्या विचाराने माणूस हादरतो. पण ही घटना खरोखर कोचिंग शहर असलेल्या कोटा येथील एका व्यक्तीसोबत घडली आहे. ही व्यक्ती सकाळी बाथरुम गेला तेव्हा त्याला टॉयलेटच्या फ्लश टँकवर 5 फूट लांब साप आढळून आला. (Cobra On Flush Tank) त्यानंतर भितीने त्याने धूम ठोकली. यानंतर सर्पमित्राच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आले.
[read_also content=”हिलेच्या वेशात मेगा मार्टमध्ये घुसून 22 लाखांहून अधिक रोकड चोरली; मात्र, पुरुषांच्या चप्पलनं केला पर्दाफाश, ‘अशी’ झाली चोराला अटक https://www.navarashtra.com/crime/man-steals-more-than-22-lakh-cash-in-mega-mart-in-womens-gate-up-nrps-430665.html”]
राजस्थानमधील कोटा येथील कोटा खारी बावडीचे येथील ही घटना आहे. येथील गोविंद शर्मा यांच्या घरात 5 फूट लांब कोब्रा आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेल्यानंतर त्यांना टॉयलेटच्या फ्लश टँकवर 5 फूट लांब साप आढळून आला. सापाला पाहताच त्यांची घाबरगुंडी उडाली. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने रेस्क्यू टीमला माहिती दिली. सुमारे तासाभरानंतर बचाव पथका गोविंद शर्मा यांच्या घरी पोहोचले. यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर नागाची सुटका करून जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
बाथरूममध्ये सापडलेल्या कोब्राचा व्हिडिओही समोर आला आहे. प्रकरण कोटा खारी बावडीचे आहे. येथे राहणाऱ्या राजेंद्र जांगीड यांच्या बाथरूममध्ये 5 फूट लांब कोब्रा घुसला. घरातील एक तरुण बाथरुममध्ये गेला असता कोब्रा पाहून तो बेशुद्ध पडला.
हे पाहून घरातील सर्व सदस्य जमा झाले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर लोकांनी बचाव पथकाला माहिती दिली. बचावासाठी आलेल्या गोविंद शर्मा यांनी सांगितले की, 5 फूट लांबीच्या कोब्राची सुटका करून जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.
राजस्थानमधील भिलवाडा येथील एका मंदिराचे महंत सीताराम बाबा सर्प मित्र या नावाने ओळखले जातात. गेल्या 20 वर्षांत त्यांनी सुमारे 5 हजार सापांची सुटका करून त्यांना जंगलात सोडले आहे. सीताराम हे शाहपुरा नगरच्या उदयभान गेट राम मंदिराचे महंत आहेत.