रायपूर : श्रद्धा वालकर हत्याकांडाने (Shraddha Walkar Murder Case) संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशाचप्रकारची घटना छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये (Bilaspur Crime) घडली. एका तरुणाने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे 6 तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
बिलासपूरच्या उसलापूर पोलीस ठाण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. एका तरुणाने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे 6 तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत टाकले. जवळपास 2 महिने मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवून ठेवण्यात आला होता. पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. या संशयातून त्याने पत्नीची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत:ला वाचवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीत फेकले.
अवयव सापडले पिशवीत
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध घेतला असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना पाण्याच्या टाकीत शरीराचे अवयव असलेली पिशवी सापडली.
संशयातून हत्या; आरोपी पती अटकेत
पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता. बायकोचं कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं. ज्यानंतर त्याने हत्या केली. सीता साहू असे मृताचे नाव असून पवन ठाकूर असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सध्या पोलीस आरोपी पवन ठाकूरची चौकशी करत आहेत.