नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. या मेट्रोला दिल्लीची लाईफलाईन असेही म्हटले जाते. पण याच मेट्रोमध्ये तरुण जोडप्याचा रोमान्स सीन यापूर्वी दिसला होता. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. पण यामध्ये मेट्रोतील काही महिलांनी जोडप्याला (Couple Video) हटकले. त्यामुळे वाद देखील झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
https://twitter.com/adamantperson/status/1673220809220042753
दिल्ली मेट्रोमध्ये एक जोडपे रोमान्स करत होते. हे पाहून सहप्रवासी असलेल्या काही महिलांनी आक्षेप घेत जोरदार विरोध केला. त्यामुळे महिला आणि जोडप्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी या महिलांनी तुम्हाला इतकीच इच्छा होत असेल तर घरी जाऊन हे करा, असेही त्या जोडप्याला सुनावले. त्यामुळे त्यांच्यामधील वाद आणखीनच वाढला. या जोडप्याने महिलांनाच काही तक्रार वाटत असेल तर मेट्रोतून खाली उतरा, असेही म्हटले. यामध्ये तरुणीही जोरदार विरोध करत होती.
यापूर्वीही असे अनेक प्रकार
दिल्ली मेट्रोमध्ये एका जोडप्याला किस करतानाचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. त्यामुळे मेट्रोची दिल्लीतच नाहीतर देशभरात चर्चा सुरु होती. मेट्रोमध्ये आंघोळ करताना, केस कोरडे करताना आणि दात घासतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत. इतकेच नाहीतर एका व्हिडिओमध्ये तर एक तरुण हस्तमैथुन करताना दिसत होता. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.