छत्रपती संभाजीनगर मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवजात बालकाला जन्मदेताच निर्दयी आईनेच रस्त्यावरील कचर्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरातच मुलाला जन्म देऊन निर्दयी आईने रस्त्यावरील कचऱ्यात फेकले. त्यांनतर त्या बालकाचे कुत्र्याने लचके तोडण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाला सुखरूप पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात पती पासून २४ वर्षीय गर्भवती तरुणी वेगळी राहत होती. त्या तरुणीने एकटीने बाळाला जन्म दिला आहे आणि कुटुंबापासून ही बाबा लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. विशेष म्हणजे पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्रयांनीं दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला.
यात ही गोणी एकदा बसखाली देखील आली. तरीही तीनदा संकट ओढवूनही सतर्क नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिले. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता पुंडलिकनगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली. गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
नागपूर हादरलं! सोशल मीडियावर मैत्री, घरात एकटी असतांना अल्पवयीन मुलीने १८ वर्षीय मुलाला घरी बोलावले आणि…
नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव दिवाणशु मेरावी असे असून तो पाचपावली ठक्करग्राम येथील रहिवासी आहे. आरोपीवर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम चार अंतर्गत आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पीडित १४ वर्षीय मुलगी शहरातील एका प्रतिष्ठीत शाळेत शिकते. दोन महिन्यापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीतेसोबत मैत्री केली. २३ ऑगस्ट रोजी मुलीने उत्तर नागपूर भागातील समता नगर येथे तिच्या आजीच्या घरी ती एकटी असतांना त्याला गप्पा मारण्यासाठी बोलावले.
तिच्या एकटेपणाचा फायदा घेत मुलाने तिचे वय माहित असतांना देखील तिथे तिच्यावर जबरदस्ती केली. घटनेनंतर पीडित मुलीने घाबरून ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. परंतु त्या घटनेनंतर तिच्या वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध करत आहे.