Photo Credit- Social Media दिल्ली विधानसभा निवडणूक
Delhi Election 2025 : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) ने आज (9 डिसेंबर) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिल्लीत फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात, त्याआधीच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAPने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. प्रचार आणि सभांसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी आपने दोन महिने आधीच आपल्या उमेदवारांची दुसरी यादी तयार केली आहे. यामध्ये 20 उमेदवार रिंगणात आहेत.
आपने नोव्हेंबरमध्ये पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 11 उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यापैकी सहा असे नेते आहेत ज्यांनी नुकतेच काँग्रेस किंवा भाजप सोडून केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर तीन असे उमेदवार आहेत जे गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. तरीही ‘आप’ने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना तिकीट दिले.
Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष, एकमताने झाली निवड
अनिल झा, बी.बी त्यागी, वीर सिंग धिंगन, ब्रह्मसिंह तन्वर, झुबेर चौधरी आणि सोमेश शौकीन यांनी अलीकडेच आपमध्ये प्रवेश केला. केजरीवाल यांनी आपल्या जुन्या नेत्यांऐवजी अन्य पक्षांतील नेत्यांवर विश्वास व्यक्त केला आहे.
11 तारखेला पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद; ‘या’ पर्यायी मर्गाचा करा वापर
AAP ने 2020 मध्ये देखील 2015 ची उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली होती. त्यांच्या जागा थोड्या कमी झाल्या, तरीही ते प्रचंड बहुमताने सत्तेवर आले होते 2015 मध्ये 67 आणि 2020 मध्ये 62 जागां जिंकून दिल्ली काबीज केली होती.