भोपाळ : इस्लामिक संघटना असलेल्या हिब्ज-उत- तहरीर (Hibz-ut-Tahrir) या संघटनेच्या 16 जणांना मध्य प्रदेश एटीएसनं (ATS Action) अटक केली आहे. यातील पाच जणांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आलीय. अटकेत असलेले आरोपी सध्या एटीएसच्या कोठडीत असून त्यांची चौकशी करण्यात येतेय. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी ‘लव्ह जिहाद’बाबत (Love Jihad) धक्कादायक माहिती दिली आहे. या 16 आरोपींपैकी 5 जण आधी हिंदू होते. धर्मांतरण करुन त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि हिब्ज-उत-तहरीर या संघटनेसाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. यातील तिघांनी हिंदू तरुणींशी विवाह केला. लग्न झाल्यानंतर या तिन्ही मुलींचं धर्मांतरण घडवून आणण्यात आलं. या तिन्ही तरुणींचं धर्मांतरण घडवण्यात आल्याच्या वृत्ताला राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे.
कसा सुरु आहे हा लव्ह जिहादचा खेळ
हे सगळे आरोपी वेगवेगळ्या शहरात जाऊन मुस्लिम नागरिकांसमोर भाषणंही देत असत. हिंदुंच्या विरोधात जिहादसाठी मुस्लीम तरुणांचं ब्रेन वॉश करण्याचं कामही ते करीत असत. हिब्ज-उत- तहरीर या संघटनेवर 16 देशांत बंदी घालण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशचे गुहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की, अटक करण्यात आलेल्यांपैकी 7 जणांचं धर्मांतरण करण्यात आलंय. यात एक प्राध्यापक, एक जिम ट्रेनर, एक कोचिंगचा संचालक, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक सॉफ्टवेअर टेक्निशियन आहे. हे सगळेजण तरुणांचं ब्रेन वॉश करण्याचं काम करीत होते.
हिंदू तरुणींना करत होते आकर्षित
नरोत्तम मिश्रा यांनी हेही साांगितलं आहे की, हे सगळे 15 आरोपी लव्ह जिहादचं काम करत होते. हिंदू मुलींना फसवून त्यांचंही ब्रेन वॉश करण्याचं काम ही मंडळी करत होती. त्यानंतर त्यांच्याशी लग्न करीत असत. आधी हिंदू मुलं मुस्लीम झाली, आता लग्नानंतर हिंदू मुलींना इस्लाम कबूल करण्यास भाग पाडत असल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. मध्य प्रदेशात हे षडयंत्र चालू देणार नाही, असा इशाराच गृहमंत्र्यांनी दिलाय.
ओवेसी यांच्या कॉलेजात शिकवत होता एक आरोपी
या आरोपींपैकी एक आरोपी हा ओवेसी यांच्या कॉलेजात शिकवत होता, अशीही माहिती देण्यात आली आहे. यातून या सगळ्याचं नेटवर्क आणि एकमेकांशी असलेलं कनेक्शन लक्षात येईल, असंही सांगण्यात येतंय. देशातील या सगळ्या कटाची चौकशी आता करण्यात येते आहे. त्यानंतर सगळ्या बाबी समोर येतील, असंही मिश्रा यांनी सांगितलंय.
मोहम्मद सलीम हिंदू होता, झाला मुस्लीम
एटीएस टीमनं हैदराबादच्या डेक्कन कॉलेजमधून मोहम्मद सलीमला अटक करण्यात आलीय. तो मूळचा बैरेसिया भोपाळचा रहिवासी आहे. मोहम्मद सलीमचं खरं नाव सौरभ राजवैद्य असं आहे. त्यानं २००९ मध्ये लग्न केलं आणि २०१० साली त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला. आई-वडील समाजानं विरोध केला, तर सलीमच्या पत्नीनं २०१२ साली मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यानंतर हे दोघंही हैदराबादला शिफ्ट झाले. भोपाळमधून धर्म परिवर्तनाचं सर्टिफिकेट मिळालं नाही तर त्यांनी महाराष्ट्रातून ते मिळवण्याचा प्रयत्न केला.
आरोपी सलीम हा देशातील हिब्ज-उत- तहरीर या संघटनेचा म्होरक्या आहे. हैदराबादमध्ये शिफ्ट झाल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांच्या डेक्कन कॉलेजात सलीम प्रोफेसर म्हणून काम करत होता. भडकाऊ भाषणंही तो देतो. याच प्रमाणे दुसरा आरोपी जिम ट्रेनर होता त्यानं हिंदू मुलीसी लग्न केलं आणि तिला धर्मांतरण करण्यास भाग पाडलं. या १५ आरोपींच्या जबाबानंतर आता एटीएस पुढची कारवाई करते आहे.