भिलवाडा : राजस्थानमधील भिलवाडा (Crime in Bhilwada) येथील एक भयंकर आणि मानवतेला काळीमा फासणारी घडना उजेडात आली आहे. येथे 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर (Gangrape on Minor Girl) तिला कोळशाच्या भट्टीत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी तिने घातलेल्या चांदीच्या बांगड्या आणि चप्पलच्या जोडीवरून तिची ओळख पटली.
भिलवाडा येथील कोटरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बुधवारी रात्री ही संतापजनक घटना उघडकीस आली. तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला असावा, असा संशयही व्यक्त केला जात आहे. ही घटना जिल्ह्यातील कोटरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. गावातील सर्व नातेवाईकांच्या घरात, शेताची झडती घेतली. रात्री आठ वाजता कुटुंबीय व ग्रामस्थांनी पुन्हा अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला.
रात्री दहाच्या सुमारास गावाबाहेरील कालबेलियांच्या छावणीत कोळसा बनवण्याची भट्टी जळत होती. पावसाळ्यात ही भट्टी पेटवली जात नाही. त्यांना संशय आल्याने त्यांनी भट्टीत जाऊन पाहिले असता. त्याच्या बहिणीचे जोडे सापडले. तसेच तिने घातलेले चांदीचे कडे आणि हाडांचे तुकडे आगीत सापडले.
पीडितेच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी बुधवारी सकाळी आठ वाजता शेळ्या घेऊन घरातून निघाली होती. नेहमी ती दुपारी घरी येत असे. मात्र, दुपारी 3 वाजेपर्यंत ती परतली नाही. चिंताग्रस्त नातेवाईकांची घरे व शेतात जाऊन शोधाशोध सुरू केली. पण, तिचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अत्याचार करून जाळून मारल्याचा आरोप
तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करून जाळून ठार मारल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळावरून सापडलेल्या अल्पवयीन मुलाच्या बांगड्या व इतर सामानावरून तिची ओळख पटवली आहे. तसेच कोळशाच्या राखेत तिच्या शरीराचे काही तुकडेही सापडले आहे.
कठोर कारवाईची मागणी
राजस्थान भाजपने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये आमदार अनिता भदेल, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रक्षा भंडारी, माजी आमदार अतारसिंह भदाना यांचा समावेश आहे. राज्यमंत्री धीरज गुर्जर यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितेच्या नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली. या भयंकर घटनेचा त्यांनी शब्दांमध्ये निषेध केला असून, दोषींवर त्वरीत आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.