भवानीपूरमध्ये अमित शाह रोड शो दरम्यान तृणमूल आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष झाला. (फोटो - सोशल मीडिया)
Amit Shah in West Bengal : कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) शह देण्यासाठी अमित शाह स्वतः मैदानात उतरले आहेत. खास रणनीती आखून भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रोड शो पार पडला असून याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साह निर्माण केला. मात्र काही ठिकाणी रोड शोला गालबोट लागल्याचे दिसून आले.
कोलकातामधील भवानीपूर परिसर केवळ एका विधानसभा मतदारसंघासारखाच नव्हे, तर रणांगणासारखा दिसत होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी रोडशोला सुरुवात करताच, उत्साहापेक्षा तणाव अधिक स्पष्टपणे जाणवत होता. भाजपचा ताफा पुढे सरकत असताना, रस्त्यांवर राजकारणातील कटुता स्पष्टपणे दिसू लागली.
लोकशाहीत जिथे शांततापूर्ण निवडणूक प्रचाराची अपेक्षा असते, तिथे आज केवळ द्वेष आणि संघर्षच दिसून आला. या रोडशोने बंगालच्या राजकारणातील कटुता पुन्हा एकदा उघड केली आहे, जी निवडणुका जवळ आल्यावर अनेकदा समोर येते.
हे देखील वाचा : आता अवैध प्रवासी वाहतुकीची खैर नाही…! परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर जोरदार संघर्ष
या रोड शोच्या नाट्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण तेव्हा आला, जेव्हा भाजपचा एक मोठा ताफा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खाजगी निवासस्थानासमोरून गेला. सुवेंदू अधिकारी आणि अमित शाह यांची वाहने रस्त्याकडे येत असतानाच, तिथे मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आधीच उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षातील राजकीय आणि वैयक्तिक कटुता देखील दिसून आली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Kalighat, Kolkata: During Union Home Minister Amit Shah’s rally, BJP supporters raised slogans as the procession passed through an area considered a TMC stronghold. The slogans led to a minor tense situation, with authorities present at the spot bringing the situation under… pic.twitter.com/wPLdncICOo — IANS (@ians_india) April 2, 2026
ममता बॅनर्जींच्या घराजवळ भाजपचा मोर्चा आल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही गट फक्त काही मीटर अंतरावर होते आणि परिस्थिती झपाट्याने अत्यंत तणावपूर्ण झाली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असूनही, दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अगदी जवळ आल्यामुळे, येणाऱ्या-जाणाऱ्याला तिथून जाणे अवघड झाले होते. या परिस्थितीचे कोणत्याही क्षणी मोठ्या घटनेत रूपांतर होऊ शकले असते, परंतु घोषणाबाजी अव्याहतपणे सुरू होती.
हे देखील वाचा : Raghav Chadha यांची जागा घेणारे कोण आहेत अशोक कुमार मित्तल? कोट्यवधींची संपत्ती अन् शैक्षणिक पार्श्वभूमी
काही परिसरामध्ये या रॅली हिंसक वळण आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, काही भागामध्ये रोड शोला चपला दाखवण्यात आल्या आणि झेंड्यावर थुंकण्यात आले. जेव्हा आंदोलनाला हिंसक वळण लागले, तेव्हा राजकीय शिष्टाचार पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, भाजपचा ताफा जात असताना काही आंदोलकांनी कथितरित्या चपला उगारल्या, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
Chaotic situation erupted at Kalighat ahead of Suvendu Adhikari’s nomination in the presence of Union Home Minister Amit Shah. TMC and BJP workers and supporters confronted each other. pic.twitter.com/4fsaVOyVyq — Piyali Mitra (@Plchakraborty) April 2, 2026
प्रचार आणि निषेधाच्या नावाखाली काही लोक सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून पक्षाच्या झेंड्यांवर थुंकताना दिसले. टीएमसीचे कार्यकर्ते काठ्या घेऊन फिरतानाही दिसले. या कृतीने भाजप कार्यकर्त्यांचा संताप अधिकच भडकला आणि दोन्ही गटांमध्ये किरकोळ झटापट झाली. या रोड शोमुळे हे स्पष्ट झाले आहे की, भवानीपूरची लढाई आता केवळ मतांसाठी राहिलेली नाही, तर ती वर्चस्व आणि अहंकाराची लढाई बनली आहे. नामनिर्देशन आणि रोड शोच्या वेळी जर अशी परिस्थिती असेल, तर मतदानाच्या दिवशी सुरक्षेची काय स्थिती असेल, अशी चिंता आता जनतेला वाटत आहे.






