Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal: ‘मोदींच्या गर्वाचे घर खाली…उलटी गिनती सुरू’, अरविंद केजरीवालचा विधेयक नामंजूरीनंतर हल्लाबोल

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मंजूर होऊ शकले नाही. अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा पंतप्रधान मोदींच्या अहंकाराचा पराभव आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 17, 2026 | 10:52 PM
अरविंद केजरीवालांची मोदी सरकारवर कडकडून टीका (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

अरविंद केजरीवालांची मोदी सरकारवर कडकडून टीका (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विधेयक नामंजुरीनंतर अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला हल्लाबोल
  • मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे म्हटले
  • नरेंद्र मोदी यांच्या गर्वाचे घर खाली झाल्याचाही केला आरोप
१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. लोकसभेत कोणतेही घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते, जे सरकारकडे नव्हते. घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यामुळे, उर्वरित दोन विधेयकांवर म्हणजेच केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक आणि परिसीमन विधेयकावर मतदान झाले नाही.

यावर प्रतिक्रिया देताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अहंकार संपुष्टात आला आहे. ते असेही म्हणाले की, मोदी सरकारसाठी आता उलट गिनती सुरू झाली आहे. केजरीवाल हे नेहमीच नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहिले आणि आता मोदी यांच्या सरकारवरही त्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. याशिवाय भाजप अपयशी असल्याचेही म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या X अकाऊंटवर याबाबत ट्विट करत आपले मत व्यक्त केले. 

“मी आरोपी म्हणून नाही, तर…”, उच्च न्यायालयात Arvind Kejriwal यांचा जोरदार युक्तिवाद; ‘या’ मुद्द्यावर लक्ष केलं केंद्रित

पहा अरविंद केजरीवाल यांचे ट्विट 

संसद में डिलिमिटेशन बिल फेल हुआ मोदी जी के अहंकार की हार हुई मोदी सरकार की उल्टी गिनती शुरू। — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 17, 2026

भाजप सपशेल अपयशी – संजय सिंह

दरम्यान, ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी एका वेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “परिसीमन विधेयक संसदेत फेटाळले गेले. मोदी आणि भाजपला ‘तुकडे-तुकडे गँग’प्रमाणे राज्यांची विभागणी करायची होती. संसदेत महिला आरक्षण विधेयक नव्हे, तर ‘जिताओ भाजप’ विधेयक मांडण्यात आले. भाजप आपल्या जागा वाढवण्याचा कट रचत होता, पण तो सपशेल अपयशी ठरला.”

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांची एन्ट्री; जाहीर केले 14 उमेदवार

उत्तर आणि दक्षिण यांच्यात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न झाला होता – संजय सिंह

संजय सिंह पुढे म्हणाले, “उत्तर आणि दक्षिण यांच्यात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न झाला होता, आणि विरोधी पक्षाने हे विधेयक नामंजूर करून तो प्रयत्न हाणून पाडला आहे. हे अजिबात महिला आरक्षण विधेयक नव्हते. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकात म्हटले होते की, आधी जनगणना होईल, मग मतदारसंघ पुनर्रचना होईल आणि २०२९ नंतर विधेयकाची अंमलबजावणी केली जाईल. मग आम्ही म्हणालो, आज ५४३ पैकी ३३ टक्के महिला आरक्षण द्या आणि २०२४ मध्ये निवडणुका घ्या… तुम्ही बंगालमधील जागा कमी करत आहात, तुम्ही तामिळनाडूमधील जागा कमी करत आहात, तुम्ही ओडिशामधील जागा कमी करत आहात. हे करण्यापूर्वी तुम्ही कोणाला विचारत आहात?”

Web Title: Arvind kejriwal said modi government countdown started after delimitation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 10:52 PM

Topics:  

  • AAP Arvind Kejriwal
  • Arvind kejriwal
  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.