गांधीनगर : स्वयंघोषित संत आसाराम बापू (Asaram Bapu) यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूला आता जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment To Asaram Bapu) सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे.
[read_also content=”वर्गात मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्याचा शिक्षकाला आला भयानक राग, कल्याणमधल्या पाच वर्षांच्या मुलासोबत घडला ‘हा’ संतापजनक प्रकार https://www.navarashtra.com/maharashtra/teacher-beatea-a-student-in-a-kalyan-school-nrsr-366060.html”]
आसाराम बापूवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याचा आरोप आहे. सूरतमधील एका तरुणीवर 2013 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा असे आरोपी आहेत. मात्र इतर आरोपींची पुरावा नसल्याने मुक्तता करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर कोर्टाने आसाराम काल दोषी असल्याचे जाहीर केले. आज या प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 दरम्यान पीडितेवर खूपदा अत्याचार केला होता. आधीच एका प्रकरणात आसाराम बापू हा बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्ज दाखल केला होता. वाढते वय आणि ढासळती प्रकृती यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंती आसारामने केली होती. मात्र, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने जामीन मंजूर केला नाही. त्यामुळे एका प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असताना आता दुसरीकडे आणखी एका प्रकरणात आसाराम दोषी आढळला आहे आणि पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारती सांभाळत आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.