देशाला मोठा धक्का! आसाम प्लेन क्रॅशमध्ये 5 जवान शहीद, एअरफोर्सकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
Assam Plane Crash News Marathi : आसाममधील जोरहाट हवाई तळावर (रौरिया हवाई तळ) भारतीय हवाई दलाचे (IAF) एक AN-32 विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरल्यानंतर आग लागली. ही घटना जोरहाट हवाई तळाच्या परिसरात घडली. हवाई तळावर उपस्थित असलेले अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. भारतीय हवाई दलाने एक निवेदन जारी करून सांगितले की, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आसाममधील जोरहाट येथे एका नियमित उड्डाणादरम्यान त्यांचे एक AN-32 विमान कोसळले.
आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाचे (IAF) अँटोनोव्ह एएन-३२ (Antonov An-32) हे वाहतूक विमान कोसळले आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुःखद अपघातात पाच शूर जवानांनी राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान दिले आहे. मात्र, विमानाचा सह-वैमानिक गंभीर जखमी अवस्थेत अपघातातून बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लगेचच, हवाई दलाने अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समितीचे आदेश दिले.
Assam Plane Crash : आसाममध्ये मोठा विमान अपघात! भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहू विमान कोसळले
स्क्वॉड्रन लीडर (Sqn Ldr) प्रशांत सिंग
फ्लाइट लेफ्टनंट (Flt Lt) शुभम कुमार
सार्जंट (Sgt.) (सार्जंट) जितेंद्र शर्मा
अग्निवीवयू खेमरम कुमावत
अग्निवीवयू दानिश आलम
एका अधिकृत निवेदनात, हवाई दलाने म्हटले आहे, “भारतीय हवाई दल शोकाकुल कुटुंबांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त करते. संपूर्ण हवाई दल या दुःखाच्या प्रसंगी शहीदांच्या कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे.”
Deeply anguished by the loss of five Air Warriors in the An-32 accident at Jorhat, Assam. Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty. Their courage… https://t.co/eChXozjT85 — Rajnath Singh (@rajnathsingh) June 13, 2026
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघात कसा घडला याची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. जोरहाट हवाई तळाजवळ झालेल्या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे—या अपघाताला तांत्रिक बिघाड, इंजिन निकामी होणे किंवा खराब हवामान कारणीभूत होते का, हे तपासले जाईल. या चौकशीत वाचलेल्या सह-वैमानिकाची साक्षही महत्त्वपूर्ण ठरेल, कारण अपघाताच्या वेळी तोच कॉकपिटमध्ये उपस्थित होता.
१९८६ पासून, भारतात एएन-३२ विमान अंदाजे २२ अपघातांमध्ये सामील झाले आहे. त्याचा सर्वात अलीकडील अपघात २०२५ मध्ये झाला. अपघातांचा इतिहास असूनही, एएन-३२ हे भारतीय हवाई दलाच्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वाहतूक विमानांपैकी एक आहे आणि देशभरात रसद पुरवठा, सैन्य वाहतूक आणि विविध मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
या वर्षी मार्चमध्ये, भारतीय हवाई दलाचे एक एसयू-३०एमकेआय (Su-30MKI) लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळले. या अपघातात स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर यांचा मृत्यू झाला. विमानाने जोरहाट हवाई तळावरून उड्डाण केले होते. हा अपघात जोरहाट हवाई तळापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर, आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजन उपविभागातील इंगलाँग एकोपी या डोंगराळ भागात घडला.






