Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राची लॉटरी? ३ खाती महाराष्ट्राच्या पदरात पडणार
विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरात खूप काही पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल ३ खाती राज्याच्या वाट्याला येणार आहेत. ठाकरेच्या शिवसेनेतून बंडखोरी ६ खासदारांनी केली. त्यानंतर यापैकी २ जणांना थेट मंत्रिपद मिळणार असल्याचे सुत्रांकडून सांगितले जातंय. खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. हेच नाही तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची पदोन्नती होणार असून नरेंद्र मोदी त्यांच्यावर मोठी नवीन जबाबदारी देऊ शकतात.
नरेंद्र मोदी यांचा ताण कमी करण्यासाठी अमित शाहा यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळवण्याकरिता मोठी लॉबिंगही सुरू आहे. त्यामध्येच केंद्रीय मंत्री अचानक भाजप कार्यालयात दाखल झाल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारावाचत अनेक घडामोडी पडताना दिसत उत्तर प्रदेश, पंजाबच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन विस्तार दोन केंद्रीय मंत्री दिल्लीतील बीजेपी कार्यालयात पोहोचले होते. विशेष म्हणजे ते काही वेळातच कार्यालयातून बाहेर पडले. ज्यावेळी जोरदार चर्चा सुरू आहे की, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही मंत्र्याची सुट्टी होणार आहे. कारण ते कार्यालयात गेले आणि काही वेळातच बाहेर पडले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्या कॅबिनेट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे, त्याची यादी तयार आहे. मात्र, या चर्चावर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, झारखंड आणि कर्नाटकमधील आलेले केंद्रीय मंत्री पार्टी कार्यालयात कोणत्याही महत्वाच्या गोष्टीसाठी आले नव्हते तर ते नियमित येतात तसे आले होते आणि गेले. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.






