पुन्हा पेपरफुटी ! B.sc चा पेपर आता फुटला; विद्यापीठाला परीक्षाच करावी लागली रद्द (Paper Leak)
रायपूर : गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचे प्रकरण समोर येत आहे. त्यातच आताछत्तीसगडमधील रामपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात (आयजीएयू) बी. एस्सी. (कृषी) द्वितीय वर्षाची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअॅपवर फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी ७० टक्के जुळत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने घाईघाईने परीक्षा रद्द केली.
मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा नियंत्रकांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, रद्द झालेली एईएनटी 221 परीक्षा आता सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आयोजित केली जाईल. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कपिल देव दीपक यांच्या म्हणण्यानुसार, प्रश्नपत्रिकेची पाकिटे उघडण्यात आली होती. सकाळी ९:३० वाजता केंद्रांवर व्हॉट्सअॅपवर प्रसारित होत असलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची तंतोतंत नव्हती. मात्र, त्यावरील प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी सुमारे ७०% जुळत होते.
याच्या आधारावर, परीक्षा रद्द करण्यात आली असून, ही प्रश्नपत्रिका अंतर्गत फुटली की बाह्यरित्या, हे निश्चित करण्यासाठी तेलीबांधा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली जात आहे. पेपरफुटीची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप मजकूर मूळ पेपरशी 70 टक्के जुळतो
महाविद्यालयामध्ये सकाळी ते दुपारी १.०० या वेळेत अदाजे ५०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा संपताच, एक डॉक्यूमेंट सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर प्रसारित होऊ लागले. कार्यकर्त विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करत मोठे आंदोलन केले. यानंतर परीक्षा नियंत्रकांनी संध्याकाळी एक अधिकृत आदेश जारी करून परीक्षा रद्द केली.






