जम्मू :राजौरी (Rajouri Terrorist Attack) येथील एका विशिष्ट समुदायाच्या तीन घरांवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चार नागरिक ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सनातन धर्म सभा, राजौरी यांनी संपूर्ण बंद पुकारला आहे, याला विश्व हिंदू परिषद (VHP), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि वेओपार मंडळाने पाठिंबा दिला आहे.
[read_also content=”छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक; अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा ‘या’ भाजप नेत्याने केली मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-criticized-ajit-pawar-on-controversial-statement-about-chahhtrapati-sambhaji-maharaj-nrps-358559.html”]
जम्मूच्या राजौरी येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज राजौरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक व्यावसायिकांनी या बंदला पाठिंबा देत सर्व दुकानदारांना त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.या दरम्यान शहरातील वाहतूक सेवाही ठप्प राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांनी राजौरीतील डांगरी भागातील तीन घरांना लक्ष्य केले. या दरम्यान चार ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, परिसरात शोध मोहीम सुरू आहे. पोलिस, सीआरपीएफ, लष्कराच्या जवानांकडून ही शोध मोहीम राबवली जात आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांनी या संशयित दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. भाजपने केंद्रशासित प्रदेशातून दहशतवादाचा नायनाट करण्याचे वचन दिले होते तर, प्रशासन सुरक्षा आघाडीवर अपयशी ठरले आहे, असा काँग्रेसने आरोप केला आहे.