उत्तर प्रदेशमधील बांके बिहारी मंदिर खजिन्याचे दरवाजे उघडले (फोटो - सोशल मीडिया)
Banke Bihari Temple Treasure: वृंदावन: भारतातील लोकप्रिय मंदिरांपैकी एक असलेले बांके बिहारी लाल हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. मंदिराचे खजिना मानले जाणारे तोषखाना हा सर्वांमध्ये उत्सुकतेचे कारण बनले होते. मागील अर्ध शतकाहून अधिककाळ बंद असलेल्या या दरवाजामागे मंदिराची मोठी संपत्ती असल्याचा दावा केला जात होता. तोषखानामध्ये अनेक मौल्यवान गोष्टी, घडणावळीचे दागदागिने असल्याचा दावा केला जात होता. तसेच ही सर्व संपत्ती बांके बिहारी यांची वैयक्तिक खजिना असल्याचे सांगितले जात होते. संपूर्ण बंदोबस्तामध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या टीमच्या साक्षीने बांके बिहारी मंदिराच्या संपत्तीचा हा खजिना उघडण्यात आला. मात्र आतमध्ये जे काही आढळलं त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
बांके बिहारी मंदिर परिसरामध्ये भक्तांची नेहमीच गर्दी असते. मंदिराचा घोषखाना उघडण्यात येणार असल्यामुळे वृंदावनसह संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा रंगली. अधिकारी, गोस्वामी, पुजारी, पोलिस आणि काही निवडक सेवकांच्या उपस्थितीमध्ये हा दरवाजा उघडण्यात आला. सर्वांच्या नजरा एकाच ठिकाणी खिळल्या होत्या ती म्हणजे खजिन्याची खोली. ज्याचा दरवाजा गेल्या ५४ वर्षांपासून बंद होता. असे म्हटले जाते की या खोलीत इतिहास श्वास घेतो, श्रद्धा आणि गूढतेचा संगम यामध्ये आहे असे मानले जात होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अतिशय रहस्यमय मानल्या जाणाऱ्या या घोषखान्याचा दरवाजा धनतेरसच्या दिवशी उघडला जाणार असल्याचे ठरवण्यात आले. या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षणासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एनडीआरएफ, वन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धनतेरसच्या दिवशी घोषखानामधून गडगंज संपत्ती, दागिने मिळतील अशी अपेक्षा व्य्कत केली जात होती. धनतेरच्या मुहूर्तावर बांके बिहारी मंदिरातील अर्ध्या शतकापासून बंद असलेली एक खोली उघडली गेली. ती उघडण्याचा निर्णय एका उच्चाधिकार समितीच्या आदेशानुसार घेण्यात आला. दार उघडताच उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्याने पाहू लागले.
#Breaking The 160-year-old treasure of the Banke Bihari temple in Vrindavan was opened after 54 years…but all that was found in the room were two or three urns and an empty wooden box…#Vrindavan #Mathur #Khazana #Locker #Bankebiharimandir #Temple #viral pic.twitter.com/ghwtQbo6S0 — Mukund Shahi (@Mukundshahi73) October 18, 2025
रत्नजडित मुकुटांचे कोणतेही ढीग नाही
घोषखान्याच्या दरवाज्यावर दीपप्रज्वलन करुन दरवाजा उघडण्यात आला. लोकांच्या प्रयत्नांतून दरवाजे उघडण्यात आले. यावेळी आतले दृश्य एखाद्या जुन्या कथेसारखे होते. आजूबाजूला ओल्यापणाचा वास पसरला होता, भिंतींवर धुळीचे जाड थर साचले होते आणि ते पाण्यानेही भरले होते. अनेक ठिकाणी जाळ्या लागलेल्या होत्या. मंदिराच्या घोषखान्याबद्दल असलेल्या अख्यायिकेवरुन आतमध्ये संपत्ती असेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र प्रत्यक्षात सर्वांचा हिरमोड झाला. कारण लोक कल्पना करत असलेले कोणताही खजिना आतमध्ये सापडला नाही. सोने-चांदीचे किंवा रत्नजडित मुकुटांचे कोणतेही ढीग याठिकाणी नव्हते. मात्र धुळीच्या थरात झाकलेली अनेक वर्षे जुनी काही चांदीची भांडी मिळाली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
घोषखाना उघडल्यानंतर काही कलशही सापडले. काही पितळी वस्तूही सापडल्या. लाकडी पेटीही सापडल्याचे सांगितले जात आहे. आत मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याचे दिनेश गोस्वामी यांनी सांगितले, ज्यामुळे पुढील तपासात अडथळा येत आहे. ही कारवाई थांबवण्यात आली आहे. दरम्यान, सीओ संदीप सिंग यांनी सांगितले की आजची कार्यवाही थांबवण्यात आली आहे. पुढील आदेशानंतरच खजिन्याचा पुढील शोध आणि कॅटलॉगिंग केले जाईल. शतकानुशतके जुना हा खजिना मोडतोड काढून टाकल्यानंतर आणखी कोणती गुपिते उघड होतील हे पाहण्यासाठी आता सर्वांचे लक्ष समितीच्या पुढील आदेशाकडे लागले आहे