Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाणांनंतर ‘या’ दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2024 | 01:19 PM
काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाणांनंतर ‘या’ दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
Follow Us
Follow Us:

ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते सलग चार वेळा राज्यसभेचे खासदार होते. भोपाळ येथील भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरेश पचौरी यांचे स्वागत केले.

सुरेश पचौरी यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुरेश पचौरी यांनी भोजपूरमधून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. ते दोन्ही वेळा भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले होते.

पचौरी यांच्यापाठोपाठ शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काँग्रेसला राम राम ठोकण्याची शक्यता आहे. मंडीदीप, औबेदुल्लागंज, सुलतानपूर, बारीसह जिल्ह्यातील अनेक नेते पचौरी समर्थक आहेत. दुसरीकडे गजेंद्र सिंह राजुखेडी यांनी देखील काँग्रेसचा हाथ सोडला आहे. राजुखेडी हे 1998 ते 2004 पर्यंत खासदार होते.

त्यानंतर 2009 ते 2014 पर्यंत ते खासदार होते. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या न्याय यात्रेतही ते सहभागी झाले नाहीत. दरम्यान, सुरेश पचौरी आणि गजेंद्र राजुखेडी यांच्यापाठोपाठ इंदूर-१ चे माजी आमदार संजय शुक्ला यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: Big blow to congress after ashok chavan these veteran leaders join bjp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 01:19 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • india
  • lok sabha
  • narendra modi
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
1

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
2

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
3

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
4

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.