Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भारतात इंधन तुटवडा…”, पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची मोठी माहिती, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

देशात कच्च्या तेलाची उपलब्धता पूर्णपणे सामान्य असून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा नसल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 07:53 PM
पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची मोठी माहिती (Photo Credit- X)

पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची मोठी माहिती (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • “भारतात इंधन तुटवडा…”,
  • पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारकडून मोठी माहिती
  • जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने (Central Goverment) महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात कच्च्या तेलाची उपलब्धता पूर्णपणे सामान्य असून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा नसल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवसाला ५५ लाख बॅरल खप; तरीही पुरवठा सुरळीत

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑईल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा रिफायनर देश आहे. भारत दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर करतो. देशात सध्या एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप कार्यरत असून, त्यापैकी बहुतांश सरकारी कंपन्यांचे आहेत. मंत्रालयाने खात्री दिली आहे की, कोणत्याही पंपावर तेल संपणे अशी परिस्थिती उद्भवलेली नाही आणि भविष्यातही इंधनाची कमतरता भासणार नाही.

#WATCH | Delhi | Sujata Sharma, Joint Secretary (Marketing & Oil Refinery), Ministry of Petroleum & Natural Gas, says, “…As far as the crude is concerned, the situation is quite comfortable. I also told you yesterday that we use almost 55 lakh barrels of oil every day. We are… pic.twitter.com/Jhxe1V8U0O — ANI (@ANI) March 12, 2026

Opposition Protests LPG Shortage : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड

LPG उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ

केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर घरगुती गॅसच्या (LPG) उपलब्धतेसाठीही सरकारने विशेष पावले उचलली आहेत. ९ मार्च रोजी ‘अत्यावश्यक वस्तू कायद्या’अंतर्गत आदेश जारी करून सर्व रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर देशांतर्गत एलपीजी उत्पादन २५ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सुजाता शर्मा यांनी नमूद केले की, भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६० टक्के एलपीजी आयात करतो. यातील ९० टक्के पुरवठा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) मार्गे होतो. सध्याची जागतिक स्थिती आव्हानात्मक असली तरी, देशांतर्गत ग्राहकांना गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

घाबरून बुकिंग करू नका; सरकारचे आवाहन

देशात दररोज सुमारे ५० लाख एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत जागतिक तणावाच्या भीतीने ग्राहकांकडून सिलिंडर बुकिंगमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. यावर बोलताना मंत्रालयाने स्पष्ट केले की, पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त सिलिंडर बुक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सरकारांना विशेष निर्देश

इंधन आणि गॅसचे वाटप योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गरजू ग्राहकांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरची डिलिव्हरी प्राधान्य क्रमाने सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. एकूणच, जागतिक परिस्थिती कितीही बिकट असली तरी भारतातील ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सरकारने ठामपणे सांगितले आहे.

LPG आणि इंधन तुटवड्याची भीती सोडा! ४० देशांकडून पुरवठा सुरू; बुकिंगनंतर अडीच दिवसांत मिळणार सिलेंडर

Web Title: Big information from the central government regarding petrol diesel and gas supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Central Governement
  • Disel
  • LPG Gas
  • petrol

संबंधित बातम्या

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे नियम प्रस्तावित!  E85 आणि E100 इंधनाला अधिकृत मान्यता
1

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे नियम प्रस्तावित! E85 आणि E100 इंधनाला अधिकृत मान्यता

Petrol-Diesel Price Hike: निवडणूकानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का? सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांवर सरकारने सोडलं मौन
2

Petrol-Diesel Price Hike: निवडणूकानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का? सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांवर सरकारने सोडलं मौन

War Impact on Sweets: आईक्रीम-चॉकलेट लवर्सना झटका! इराण युद्धामुळे ‘स्वीट डिश’ महागल्या, Trump यांच्यामुळे भडकणार किमती ?
3

War Impact on Sweets: आईक्रीम-चॉकलेट लवर्सना झटका! इराण युद्धामुळे ‘स्वीट डिश’ महागल्या, Trump यांच्यामुळे भडकणार किमती ?

Petrol Diesel News: पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; इंधन दरवाढीच्या बातम्यांवर मोठा खुलासा
4

Petrol Diesel News: पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; इंधन दरवाढीच्या बातम्यांवर मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.