Photo Credit- Social Media मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रा यांचे राजकारणात प्रवेशाचे संकेत
नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या या संकेतांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या चौकशीला सामोरे जात असलेल्या वाड्रा यांनी गुरुवारी, १७ एप्रिल रोजी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की “जर लोकांची इच्छा असेल तर मी नक्कीच राजकारणात प्रवेश करेन आणि काँग्रेस पक्षासाठी कठोर परिश्रम करेन.” कुटुंबाच्या आशीर्वादानेच तो हा निर्णय घेईल असेही त्याने सांगितले.
रॉबर्ट वड्रा ईडीच्या चौकशीत; २००८ मधील जमीन व्यवहाराचा तपास सुरू
रॉबर्ट वड्रा सध्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या चौकशीला सामोरे जात आहेत. ही चौकशी २००८ साली हरियाणातील शिकोहापूर येथे झालेल्या एका जमीन खरेदी व्यवहाराशी संबंधित आहे, ज्यात कथित मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वड्रा यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून सुमारे ७.५ कोटी रुपयांना ३.५ एकर जमीन विकत घेतली होती. काही तासांतच पूर्ण झालेल्या या व्यवहारामुळे तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आणि २०१८ मध्ये हरियाणा पोलिसांकडून याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.ईडी सध्या मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या प्रकरणाचा तपास करत आहे.
ईडी चौकशीसाठी वड्रा सलग तिसऱ्या दिवशी हजर; राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण
गुरुवार, १७ एप्रिल रोजी रॉबर्ट वड्रा सलग तिसऱ्यांदा दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांची तासन्तास चौकशी झाली. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत प्रियंका गांधी वड्रा देखील ईडी कार्यालयात दिसून आल्या. याआधी मंगळवारी वड्रा थेट आपल्या निवासस्थानावरून पायी चालत ईडी कार्यालयात गेले होते – ज्याला अनेकांनी एक ठोस राजकीय संदेश मानले.
Supreme Court: मुस्लिमांना हिंदू धर्माच्या संस्थेवर संधी मिळले का? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
तपासाच्या पार्श्वभूमीवर वड्रा म्हणाले, “हे सर्व राजकीय सूडबुद्धीतून केले जात आहे. जेव्हा आपण सामाजिक अन्याय किंवा अल्पसंख्यांकांच्या हक्कांसाठी आवाज उठवतो, तेव्हा आपल्याला अशा चौकशीच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न होतो.” त्यांनी तपास यंत्रणांशी संपूर्ण सहकार्य करण्याचा पुनरुच्चारही केला.