दोन चिमुकलींना वाचवणारी 'ती' ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका इमारतीच्या लिफ्टमध्ये दोन चिमुकल्या अडकल्या आहेत. याच वेळी एक मुलगी देखील तिथे उभी आहे. पण अचानक लिफ्टचे सेन्सर खराब होतात आणि दरवाजा बंद होऊ लागतो. यामुळे आता असलेल्या चिमुकल्या घाबरुन रडायला लागतात. हे पाहून तेथील एक मुलगी वेळ न घालवता लिफ्टटच्या दरवाज्याच्या मध्ये उभी राहते आणि दार जोरात दाबते.
ती चिमुकल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. दार सतत बंद होत असते पण चिमुकली घाबरुन न जाता लिफ्टचा दरवाजा मागे सारत राहते. काही वेळाने तिथे काही महिला येतात. यावेळी देखील मुलगी दरवाद्याला दाबून धरते आणि तसेच एका चिमुकलीला उचलून बाहेर देते. इतर महिसा तिची मदत करत असतात. यानंतर दुसऱ्या चिमुकलीला बाहेर काढून मुलगी देखील बाहेर जाते.
व्हायरल व्हिडिओ
दो छोटे बच्चे लिफ्ट में फंस गए थे पर इस बच्ची ने समझदारी और हौसले से उनको बाहर निकाल लिया।
ये इनाम की हकदार है। pic.twitter.com/wH2016iNQD — अश्विनी सोनी (@Ramraajya) February 21, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा सर्व थरारक प्रकार लिफ्टच्या कॅमेराच कैद झाला आहे. या मुलीच्या धाडसामुळे ती लोकांची रिअल लाईफ हिरो ठरली आहे. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ramraajya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वजन मुलीचे कौतुक करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






