2-3 दिवसापुर्वी ओडीशात प्रवाशांनी भरलेली बस ओव्हरब्रिजवरून रस्त्यावर पडली होती. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. आता पुन्हा ओडिशामधे एक दुर्घटना घडली आहे. ओडिशातील झारसुगुडा येथे महानदीत बोट उलटून (Odisha Boat Capsized) 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीत 50 लोक होते. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छिमारांनी 40 हून अधिक लोकांना वाचवले.
[read_also content=”चित्रपटसृष्टी का सोडली? इतक्या वर्षांनंतर अभिनेता इमरान खाननं सांगितलं कारण! https://www.navarashtra.com/movies/actor-imran-khan-reveales-thatg-why-he-left-bollywood-nrps-525533.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील झारसुगुडा येथे शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. महिला आणि मुलांसह सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट महानदीत उलटली. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह सापडले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रिपोर्टनुसार, झारसुगुडाच्या लखनपूर ब्लॉक अंतर्गत शारदाजवळ महानदीमध्ये ही घटना घडली. येथे एक बोट लहान मुले आणि महिलांना घेऊन जात होती, ती काही कारणाने उलटली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बोट पलटी होताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक मच्छिमारांनाही या घटनेची माहिती मिळाली. स्थानिक मच्छिमारांनी तातडीने त्यांच्या स्तरावरून बचावकार्य सुरू केले.
डीजी फायर सुधांशू सारंगी यांनी सांगितले की, माहितीनंतर बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. दोन विशेषज्ञ स्कुबा डायव्हर्सना कॅमेऱ्यांसह पाण्याखाली पाठवण्यात आले. बचावासाठी भुवनेश्वरहून झारसुगुडा येथे एक टीम पाठवण्यात आली.
बोट बरगढ जिल्ह्यातील बांधीपाली भागातून प्रवाशांना घेऊन जात होती. बोट उलटली तेव्हा काप्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की हीही स्थानिक मच्छिमार उपस्थित होते, त्यांनी धैर्य दाखवून 40 हून अधिक लोकांना वाचवले. तर, बचाव पथकाला बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह सापडले आहेत.