नवी दिल्ली : भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला कुस्तीपटूचा आरोप आहे की, वैद्यकीय खर्चासाठी बृजभूषण यांनी तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती.
राउझ अव्हेन्यू जिल्हा न्यायालयात 1600 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले. ज्यामध्ये खटल्याची सुनावणी सुरू आहे. यात तक्रारकर्त्याच्या साक्षीचा समावेश आहे. फिर्यादीने आपल्या जबाबात घडलेला प्रकार कथन केला आहे. आरोपपत्रात कुस्तीपटू क्रमांक 2 म्हणून संबोधल्या गेलेल्या तक्रारकत्यांपैकी एकीने खुलासा केला की, फायनलमध्ये भाग घेऊन भारतात परतल्यावर बृजभूषण यांनी तिला अशोका रोडवरील कार्यालयात बोलावले होते.
नोटीस बजावून धमकवायचे
महिला कुस्तीपटूने असा दावा केला की, बृजभूषण कुस्तीशी संबंधित दुखापतीच्या उपचारासाठी वैद्यकीय खर्च उचलण्यास तयार आहेत. मात्र, त्यांनी त्याबदल्यात शरीरसंबंधाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुस्तीपटूने ही अट मान्य करण्यास नकार दिला. आरोपपत्रात क्रमांक 6 म्हणून ओळखल्या गेलेल्या आणखी एका तक्रारदाराने सिंगवर प्रोटीन सप्लिमेंट्सच्या बदल्यात सेक्सचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप केला.