Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Election 2026 रक्ताचा सडा अन् किंकाळ्या! दांतनमध्ये भाजपच्या रॅलीवर शस्त्रसज्ज हल्ला; भाजप उमेदवार जखमी

या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांना मारहाण करत अनेक वाहनांचे नुकसान केले. रॅलीतील काही मोटारसायकलींना रस्त्यावरच पेटवून देण्यात आले.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 23, 2026 | 11:50 AM
West Bengal Election Violence 2026, Dantan Assembly Constituency, Ajit Kumar Jana Attack,

West Bengal Election Violence 2026, Dantan Assembly Constituency, Ajit Kumar Jana Attack,

Follow Us
Follow Us:

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही रणधुमाळीने पश्चिम बंगालमधील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी, पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा गलबला शांत होत असतानाच, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील दांतनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, प्रचाराच्या शेवटच्या काही तासांत उसळलेल्या या हिंसाचारामुळे संपूर्ण दांतन भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दांतन विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या रॅलीमध्ये अचानक रणांगणात बदलले. यामुळे या भागात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दांतन विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अजीत कुमार जाना यांच्या समर्थनार्थ हरिपूर येथून मोठी बाईक रॅली काढण्यात आली होती. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही रॅली मोहनपूरकडे जात असताना सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र, आंतला परिसरात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांच्या गटाने रस्ता अडवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रॅलीतील कार्यकर्त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोरांकडे लाठी-काठ्या आणि धारदार शस्त्रे होती, ज्यांच्या सहाय्याने त्यांनी कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला.

Kedarnath Dham : ‘हर हर महादेव’च्या गजरात उघडले केदारनाथ धामचे द्वार; मोबाईल वापर अन् रिल्सवर बंदी

शस्त्रसज्ज हल्ला आणि जाळपोळ; मोहनपूर रणांगणात

या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांना मारहाण करत अनेक वाहनांचे नुकसान केले. रॅलीतील काही मोटारसायकलींना रस्त्यावरच पेटवून देण्यात आले. जळणाऱ्या वाहनांचा धूर, फुटलेल्या काचा आणि सर्वत्र पसलेला गोंधळ यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत अजीत जाना यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या हिंसाचारामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

जखमींवर रुग्णालयात उपचार; एकाची प्रकृती गंभीर

हल्ल्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना तातडीने मोहनपूर ब्लॉक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यापैकी एका कार्यकर्त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याला पुढील उपचारांसाठी ओडिशातील बालासोर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. संबंधित कार्यकर्ता सध्या जीवासाठी झुंज देत आहे. भाजपने विरोधकांवर राजकीय द्वेषातून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

West Bengal News: भाजपचे ६५ तर तृणमूलचे ३० टक्के उमेदवार गंभीर गुन्हेगार; ADR अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

पोलिसांचा फ्लॅग मार्च; परिसरात कडक बंदोबस्त

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण दांतन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस व केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी मोहनपूर पोलीस ठाण्यासमोर एगरा-सोलपाटा राज्य महामार्ग रोखून धरला आणि हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेस ने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे.

 

Web Title: Brutal attack on bjp rally in bengal vehicles set on fire tmc supporters accused of violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • BJP Politics
  • TMC Election 2026
  • west bengal assembly election
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

Vidhan Parishad Election 2026: बंडखोरांना दणका!  महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
1

Vidhan Parishad Election 2026: बंडखोरांना दणका! महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक
2

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
3

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले
4

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.